|
स्त्री. १ दागिने तयार करतांना , घासतांना , कानसतांना त्यांचे गोळा न करतां येण्यासारखे परमाणू उडाल्यानें मूळ वजनांत येणारी तूट . गाळणींत , घाट करण्यांत अगर वहिवाटींत लागलेली घट खर्च घालण्याची मंजूरी देणें . ( बडोदें ) खानगी खात्यांतील अंमलदारांचे अधिकार १७८ . २ धान्य मापतांना , तूप इ० पदार्थ तोलतांना मूळ मापांत - वजनांत होणारा कमीपणा ; तूट ; घस . आमचा माल निर्मळ असून त्यांत घट फार निघाली अशा प्रकारचे पुष्कळ बोभाटे नेहमीं पत्रांतून येतात . - मुंव्या प्रस्तावना ५ . ३ नुकसान ( गळती , नास , आटणी इ० मुळें झालेलें ); तूट . ( क्रि० येणें ; लागणें ). हाली शिक्याला घटती कीं बढती ? ४ ( सामा . ) र्हास ; उतार ; कमती होणें . ( क्रि० येणें ; लागणें ). ५ ( मातकाम ) घोटकाम करतांना किंवा कोरीव काम करतांना खालीं पडलेली माती . [ सं . घट = घासणें , हलवणें , मारणें ; हिं . घटना , घटती ] ०वध स्त्री. ( गु . ) ( वजन - माप - इ० कांतील ) तूट अथवा वाढ ; कमजास्तपणा ; [ घट = तूट + सं . वृध - वध = वाढ ]
|