|
न. १ ( संगीत ) पहिल्यांत चिजांचे बोल , दुसर्यात तनानादि अक्षरें , तिसर्यांत स्वर , चौथ्यांत पखवाजाचे बोल अशा प्रकारचें गीताई पद्य . २ बुध्दिबळांचा खेळ . यांत घोडा , उंट , हत्ती व प्यादीं हीं चार अंगें असतात . - वि . १ ज्याला चार अंगें , शक्ती , साधनें ( हत्ती , घोडे , रथ , पायदळ इ० ) आहेत अशा प्रकारचे ( सैन्य ); सेनेचें विशेषण . चतुरंगा परिवारा । संजोडियां रहवरा । - ज्ञा ११ . ३९७ . २ कपाळावर चार दिशांस चार भोंवरे असलेला ( घोडा ). - अश्वप १ . ८७ . [ सं . ] सामाशब्द - ०दळ सेना - नस्त्री . हत्ती , घोडे , रथ , पायदळ हीं चार अंगें ज्यांत आहेत असें सैन्य . रथकुंजर पालाणा । सन्नध्द करा चतुरंगसेना । - एरुस्व ५ . ३९ . ०बल न. चतुरंग सैन्य . २ ( आधुनिक ) घोडदळ , पायदळ , आरमार व वैमानिक दळ . ०लिपी स्त्री. बुध्दिबळांच्या खेळांतील खेळया उतरण्याची संक्षिप्त लेखन पध्दति . जसें . राघो = राजाचा घोडा , वउं x हप्या = वजिराचा उट हत्तीच्या घरांतील प्यादें मारतो , घो ( रा२ ) - उं ३ = राजाच्या दुसर्या घरांतील घोडा उंटाच्या तिसर्या घरीं जातो ; ००० = राजा वजिराकडील बुरजांत जातो इत्यादि .
|