|
अ.क्रि. १ ( जमीनीवर , भिंतीवर ) चित्रें , आकृती काढणें . २ ( कागदावर ) खरडणें ; रेघोटया , फराटे काढणें . ३ ( चित्रांतील रेघांप्रमाणें ) बारीक बारीक धारांचा पाऊस पडणें ; झिमझिम पाऊस पडणें . स.क्रि. १ चित्रांनीं , आकृतींनीं आच्छादणें ( जमीन भिंत इ० ); ( जमीनीवर , भिंतीवर ) चित्रें काढणें . हृदयभिंतिवरी चितरावा । - दावि २७२ . २ ( कागदावर ) रेघोटया , फराटे मारणें . ३ वाईट रीतीनें चित्रें , आकृती इ० काढणें . ४ ( वार्यानें ) आकाश बारीक ढगांनीं आच्छादित करणें . [ सं . चित्र , चित्र ; तुल० हिं . चितरना ]
|