|
स्त्री. १ एक प्रकारचा लहान पक्षी . हा रानांत न राहतां मनुष्यानें गजबजलेल्या वस्तींत राहतो . हा जगांतील बहुतेक भागांत आढळतो . ह्याची उपजीविका धान्य व किडे यांवर असते . २ चिमण्यांतील मादी . ३ लांकडाचें , मातीचें चिमणीचें चित्र , ज्यांतून शिटी वाजवितां येतें तें . ४ दोन वाटोळया खापर्यांस चामडें मढवून केलेलें खेळणें ; कुडमुडें . ५ दारांचीं , खिडक्यांचीं तावदानें बंद करण्याच्या उपयोगी असलेलें , काटयाभोवतीं फिरणारें चिमणीच्या आकाराचें लांकडी बोंड . ६ केळफुलांतील कावळयाच्या , चोराच्या तळांतील कोश . हा शुभ्र व अर्धवट पारदर्शक असतो . हा भाजीला निरुपयोगी असतो . ( वाप्र . ) - च्या दांतानें फोडणें - ( सुपारीसारखा ) खाद्य पदार्थ वस्त्रांत गुंडाळून दांतांनीं फोडणें . असें केल्यानें तो पदार्थ मुखरसदूषित , दुसर्या माणसानें खावयास उष्टा होत नाहीं अशी ( मुलांची ) समजूत आहे . स्त्री. १ ( गिरण्यांतील , कारखान्यांतील ) उंच धुरांडें . पुण्याच्या आसपास शेंकडों चिमण्या उभ्या राहतील ... - टि १ . १६९ . २ धारें ( धूर बाहेर घालविण्यासाठीं घराला असतें तें ). ३ राकेलच्या दिव्याच्या बर्नरवर ठेवण्याची कांचेची नळी , फुगा इ० ४ तेल इ० ओतण्यासाठीं केलेलें नरसाळें . ५ टिनच्या पत्र्याचा धुराडदिवा . [ इं . चिमूनी ] ०सारखें करणें - ( निराशेमुळें , दु : खामुळें , अपमानामुळें ) मुद्रा , तोंड , चेहरा उतरणें ; निस्तेज होणें ; एवढेंसें तोंड करणें . पण पहा तो कंसें चिमणीसारखें तोंड करून बसला आहे . - गुप्तमंजूष . - चे पोहे - पु . एक प्रकारच्या गवताचें बीं . हें चिमण्यांस फार आवडतें . पोहे पहा . - ची मुरकुंड - स्त्री . एक प्रकारची चिमण्यांच्या चित्रांनीं ( भिंत इ० कांवर ) कांढलेली , रंगविलेली वर्तुलाकृति . हींत चिमण्यांचीं तोंडें बाहेर असतात . [ सं . चीव - चिवणी - चिमणी - राजवाडे , ग्रंथमाला ] तोंड करणें - ( निराशेमुळें , दु : खामुळें , अपमानामुळें ) मुद्रा , तोंड , चेहरा उतरणें ; निस्तेज होणें ; एवढेंसें तोंड करणें . पण पहा तो कंसें चिमणीसारखें तोंड करून बसला आहे . - गुप्तमंजूष . - चे पोहे - पु . एक प्रकारच्या गवताचें बीं . हें चिमण्यांस फार आवडतें . पोहे पहा . - ची मुरकुंड - स्त्री . एक प्रकारची चिमण्यांच्या चित्रांनीं ( भिंत इ० कांवर ) कांढलेली , रंगविलेली वर्तुलाकृति . हींत चिमण्यांचीं तोंडें बाहेर असतात . [ सं . चीव - चिवणी - चिमणी - राजवाडे , ग्रंथमाला ]
|