|
अ.क्रि. १ ( बंदूक उडतांना , काठी मारतांना ) प्रत्याघात होणें ; झटका देणें ; उसळी खाणें . २ झटका बसणें ; प्रत्याघातानें ( हात इ० ) व्यथित होणें . [ घ्व . ? ] झिंजारा , झिंजाडा - पु . १ ( बंदूक , तोफ इ० उडतांना किंवा काठीनें मारतांना होणारा ) प्रत्याघात , धक्का , झटका ; उलट खाणें . ( क्रि० होणें ; येणें ). २ वरील धक्क्यानें ( हात इ० कांवर ) होणारा परिणाम , वेदना . ( क्रि० बसणें ). उ.क्रि. १ ( एखाद्यास ) केंस धरून खालीं पाडणें ; झिंजी धरून वांकविणें . २ झिडकारणें . थोरपणासि पाडिले । वैभवासि लिथाडिलें । महत्त्वासि झिंजाडिलें । विरक्तिबळें । - दा ५ . ९ . ३८ . ३ झुगारणें ; झाडणें ( हात , पाय इ० ). सोडवूनि मगरमिठी । झिंजाडोनि लोटिला । - मुसभा ७ . २५ . - आसी ४५ . ४ ( ल . ) झिडकावणें ; तिटकारणें ; हुर्यो , छी : थू करणें ; झिटकारणें . [ झिंजा ]
|