|
नारायणरावाच्या वधानंतर राघोबादादाच्या विरुद्ध सवाई माधवरावास गादीवर बसविण्यासाठीं जे सरदार वगैरे एकत्र झाले ते पुढीलप्रमाणें होते. नाना फडणीस, नारो आपाजी, बाबूराव केशव, विसाजी कृष्ण बिनीवाले, त्रिंबकरावमामा पेठे, आपा बळवंत मेहंदळे, कृष्णराव बहिरव थत्ते, आपाजी पुरंदरे, हरीपंत तात्या फडके, १० आनंदराव पानसे, १ खासगीवाले, १ सखाराम बापू बोकील. दुसर्या बाजीरावाच्या कारकीर्दीच्या आरंभीं शिंद्याच्या वर्चस्वाविरुद्ध जो शेणवी सरदारांचा कंपू असे त्यालाहि बारभाई असें म्हणत. त्यांत जिवाजी यशवंत, यशवंतराव शिवाजी, बाजीबा मोदी, मालजी गावडे वगैरे सरदार होते. -खरे ७३९ ( १ व्या खंडाची प्रस्तावना.) अनेक हातीं सत्ता कोणीहि एक नियंता नसून अनेकांनीं कारभारांत ढवळा ढवळ करीत असावें अशी स्थिति. यावरुन अव्यवस्था, गोंधळ.
|