|
वि. ज्ञात ; माहीत ; ठाऊक . मालूम करणें . - रा १५ . ३१ . [ अर . मअलूम ] मालूमत , मालुमत , मालूमात , मालुमात , माती - स्त्री . घडलेल्या गोष्टींतील सर्व मुद्दे , कलमें ; यच्चयावत परिस्थिति ( एखाद्या कृत्याची ); कच्ची हकीगत . माहिती . माझी मालुमात हि लिहिणें . - पेद २१ . ५५ . माहितीचा कागद पत्रांतील मजकूर . - पया १८० . ( भाषण , लेख इ० काचा ) खोटेपणा . या पत्रांत जें लिहिलें आहे ही सर्व मालुमत आहे , हा मजकूर खरा नव्हे . मालूम केलेली , सांगितलेली सर्व हकीगत ; अर्ज . - वि . खोटा ; बनावट ( दस्त ऐवज ). बहुत बारकाईनें ( चवकशी ) करुन मालुमातील असतील , निकामी तीं दूर करावीं . - वाडमा २ . ४४ . मालूम , दानद , मालूम मीदानद - स्त्री . ( विशेषतः सरकारी पत्रांतील ) कळवितों , निवेदन करतों , माहीत करतों अशा अर्थाचा शब्दसमूह . [ फा . मआलूम मिदानद ]
|