|
पु. ताग , अंबाडी , घायाळ वगैरेच्या सालीचा दोर ; तंतु . पु. एक पक्षी . स्त्री. वाणी ; भाषण ; आवाज ; वाचा ; बोलण्याची शक्ति किंवा इंद्रिय . [ सं . वाक ] सामाशब्द - स्त्री. ०चतुष्ट्य न. वाणीचे चार प्रकार - परा , पश्यंती , मध्यमा व वैखरी . स्त्रियांचे एक बाहुभूषण ; दंडांतील दागिना . नेपुरे वांकी कट किंकिणी । - वेसीस्व ५ . ६ . पायांतील वाळे ; पायांतील दागिना . गर्जती चरणी वाकी अभिनव । - तुगा २९१ . - न . १ होडीची फासळीसारखी लांकडे ; रोजापासून वर्यापर्यंत ठोकावयाची कमानदार लांकडे . ०चातुर्य न. बोलण्यांतील कौशल्य ; वक्तृत्व . ०चापल्य न. रहाटास आढ्यांच्या दोन बाजूंस बसवितात ती बांकदार लांकडे . - पु . वक्रता ; वांकडेपणा . बोलण्यांतील अस्खलितपणा , चतुरता . ( ल . ) कल ; झोंक ; ओढा ; तोल . बडबड ; वटवट ; भरमसाटपणे बोलणे , अतिशय बोलणे . ०पटु वि. बोलण्यांत कुशल , तरबेज ; पंडित ; वक्ता . ( ल . ) द्वेष ; तेढ ; मत्सरबुध्दि . ( ल . ) दोष ; चुकी . ह्यांत शिवबाचा कांही वांक नाही . - सूर्यग्न २ . ०पंडित पु. ( उप ) ताडकन उत्तर देणारा मनुष्य ; वाचाकुशल ; तडकाफडकी उत्तर देणारा . ०पथ पु. संभाषण ; भाषणाचा ओघ . नुसतीच शांतिकथा । आणिजेल कीर वाक्पथा । - ज्ञा १३ . ११५५ . ( व . ) तथ्य ; अर्थ . त्यांत कांही वाक नाही . वाकडवेळा - वाकरवाळ्या - वेळा - स्त्री . वाकी ; स्त्रियांच्या दंडावर घालण्याचा दागिना . ०पाटव न. बोलण्यांतील तत्परता ; सद्यः - प्रत्युत्तर देण्याची कला . ०पारुष्य न. कठोर भाषण ; खरडपट्टी ; शिवीगाळी ; दुर्भाषण . ०प्रचार पु. भाषेतील संप्रदाय ; म्हणी ; विशिष्ट शब्दसमुहास वारंवार उपयोजिल्यामुळे विशिष्ट अर्थ येण्याचा प्रकार ; रुढी . ०प्रतिबंध पु. भाषणबंदी ; बोलण्याचे थांबविणे ; गप्प करणे , बसविणे ; तोंड बंद करणे ; कुंठित करणे . स्तब्धता ; शांतता ; निःशब्दता . ०सरणी स्त्री. बोलण्यांतील अस्स्खलितपणा ; वाक्प्रवाह ; शैली . ०सिद्धी स्त्री. शब्दातील अमोघता ; बोललेला शब्द खरा होण्याची शक्ति . ०सुक्रुत न. वचन . म्हणुनु वाक्सुक्रुत दिधले . - मंगळवेढे लेख , ग्रंथमाला . ०सृष्टी स्त्री. बोलण्यांतील चातुर्य . विविधता , कौशल्य . हे वाक्सृष्टि एके वेळे । देखतु माझे बुद्धीचे डोळे । - ज्ञा १४ . २० . स्तम्भ पु . बोलण्यांत अडखळणे ; थांबणे ; वाग्रोध ; गहिंवरामुळे वगैरे बोलतांना कुंठित होणे . वाग्जल्प ना पुस्त्री . वल्गना ; बडबड ; वटवट ; लबलब ; टकळी . ०जाल न. शब्दपांडित्य ; बडबड ; वटवट ; पोकळ भाषण . वाग्निश्चयाचे वाग्जालिक । शब्द शास्त्रे सोडिली । - एरुस्व २ . ३७ ; - ज्ञा १३ . २० . ०दंड पु. धमकी ; खरडपट्टी शब्दताडन . वाचेना संयम ; भाषणावर नियंत्रण . ०दत्त वि. वाडनिश्चय झालेला ; शब्दांनी दिलेला ; विवाहवाचन दिलेला . तोंडी वचन दिलेला ; शब्दांनी संमत केलेला ; वचनांकित . ०दान न. वाडनिश्चय ; विवाहाचा करार ; वरवधूयोजना . तोंडी करार ; वचन . ०दुष्ट वि. अभद्र बोलणारा ; अपशब्द बोलणारा . चुकीचे बोलणारा ; चुकीची भाषा वापरणारा . ०देवता स्त्री. वाणीची देवता ; सरस्वती . ०दोष पु. वाणीची अशुद्धता ; चुकीचे उच्चार . अपशब्द ; निंदा ; अश्लीलता . जिव्हाभ्रंश ; चुकून शब्द बाहेर पडणे ; वाक्स्खलन . ०धज ध्वज पु . वाणीरुप पताका . प्रसिद्धी ; दवंडी . स्वधर्मु वाग्ध्वजी । बांधी नेणे । - ज्ञा १३ . २०७ . ०नियम डनियम पु . भाषेसंबंधी , बोलण्यासंबंधी नियम , विधि . भाषणबंदी ; बोलण्यावरील नियंत्रण . मौन ; मूकत्व . वाडनियम सदैव विहित कां गमला । - मोसभा ३ . ७ . ०निरोध डनिरोध पु . बोलणे कुंठित करणे ; गप्प करणे . वाचेवरील संयम ; निःशब्दता , शांतता . ०निश्चय डनिश्चय पु . लग्नाचा करार ; वरवधूयोजना ; वरवधू निश्चित करण्याचा विधि . ०बाण पु. कठोर शब्द ; टोंचणारे , बोंचणारे शब्द ; कटु वाचा . लागति वाग्बाण काळजाला की । - मोभीष्म १० . ८ . ०ब्रह्म न. वेद . एकी वाग्ब्रह्म अभ्यासे थोकडे केले । - ज्ञा १२ . ११२ . ०भव वि. वाचिक ; वाचेपासून होणारे . वाचे वसे ते वाग्भव । तप जाणावे । - ज्ञा १७ . २२३ . ०मय डमय न . साहित्य ; भाषेंतील ग्रंथसंपत्ति ; गद्यपद्यादि ग्रंथसमूह . - वि . शब्दांस अनुसरुन ; मूळ वचनाप्रमाणे ; वाणिरुप . विवरण जाला वाड्मय । संपूर्ण पर्याय नवमिचा । - ज्ञानप्रदीप ७७९ . वाचिक ; शब्दमय . एवं शारीर जे तप । तयाचे दाविले स्वरुप । आतां आईक निष्पाप । वाड्मय ते । - ज्ञा १७ . २१५ . ०मयी स्त्री. वाणी ; वकृत्त्व . जी एकमात्र भूषण पुरुषाप्रति तीहि वाड्मयी देवी । - गोविंदाग्रज . ०मात्रा स्त्री. सेकंद ; क्षण . ०माधुर्य न. वाणीची मोहकता , मधुरता , गोडी ; रसाळपणा . वाग्मी वि . बोलण्यांत पटाईत ; चतुर ; वक्ता . बोलघेवडा ; बोलका ; वटवट करणारा ; वावदूक . ०मुख न. आरंभीचे शब्द ; सुरवातीचे वाक्य . ०युद्ध न. वादविवाद ; आवेशयुक्त व जोराची चर्चा ; तोंडातोंडी . ०रोध पु. बोलण्याची मनाई ; तोंड बंद पाडणे ; गप्प करणे . स्तब्धता ; मूकता . ०वज्र न. शब्दशस्त्र ; वाचारुप हत्यार ; शाप . ०वल्लरी वल्ली विलासिनी - स्त्री . सरस्वती ; वाणीची देवता . ०वाद पु. वादविवाद ; वितंडवाद . पाखंडाचे दरकुटे । मोडी वाग्वाद अव्हाटे । - ज्ञा १२ . १४ . ०विलास पु. शब्दकौतुक ; शाब्दिक करमणूक ; वाणीची क्रीडा ; वाणीचा प्रभाव . जैसे सरस्वतीपुढे मूढे बहुत । वाग्विलास दाविती । भाषाविनोद ; शाब्दिक करमणूक . ०वीर शूर वि . बोलण्यांत धीट , शूर , पटाईत . ०वृद्धि स्त्री. व्याख्यानविस्तार ; स्पष्टीकरण . आतां गीतार्थाची मुक्तमुदी । लावी माझिये वाग्वृद्धी । - ज्ञा १८ . २७ . ०व्यय पु. व्यर्थ बडबड ; निरर्थक भाषण , बोलणे ; शब्दांची व्यर्थ काथ्याकूट . ०व्यापार पु. बोलाचाली ; गप्पासप्पा ; भाषण ; परस्पर बोलणे , चालणे . तेध के नाग्व्यापारा । अवकाशु असे । - ज्ञा १८ . १ . ३० . ०शून्य सून्य वि . वाचाहीन ; मुका ; बोलतां येत नाही असा . मज वाक्सुन्यास वदवावे । - दा १ . २ . २ .
|