|
पु. वात ; चलित वायु ; हवा ; न दिसणारे परंतु स्पर्शास समजणारे पंचमहाभूतांतील एक तत्त्व . - ज्ञा १५ . ३७६ . ( ल . ) वीरश्री ; स्फुरण . शिंद्यांना भरला वारा । - संग्रामगीते ७३ . संचार ; अंगांत येणे . कंपु नोहे आंगी वारा । जगदंबेचा । ऋ ६५ . [ सं . वा = वाहणे ] ( वाप्र . ) ०घालणे पंखा , चवरी वगैरे साधनांनी हवेस चलन देऊन वारा लागेल असे करणे . ०घेणे खाणे पिणे ( वासरे वगैरे ) मोकाट सैरावैरा पळूं लागणे ; उड्या मारुं लागणे . ( ल . ) निर्बंध झुगारुन देऊन स्वैर वर्तन करणे ; मोकाट सुटणे ; अद्वातद्वा बागणे . स्वरुप तुमचे पाहून पापिणी जीव आमचा प्याला वारा । - होला १०२ . तेणे करुन रांगडे बहुत वारा प्याले । - पेद २१ . १७७ . ०न किंवा न पडूं देणे - अगदी अलिप्त , दूर राहणे ; किंचितहि संबंध न येऊं देणे ; संसर्ग टाळणे . घेणे किंवा न पडूं देणे - अगदी अलिप्त , दूर राहणे ; किंचितहि संबंध न येऊं देणे ; संसर्ग टाळणे . ०पडणे वारा वहावयाचा बंद होणे . ०पिणे वारा घेणे पहा . दुःखी , उदासीन , उत्साहहीन , खिन्न , उद्विग्न होणे . ०फिरणे मत बदलणे ; स्थिति पालटणे . ०मोकळा - सोडणे - अपानवायु सोडणे ; पादणे . करणे - सोडणे - अपानवायु सोडणे ; पादणे . ०मोकळा , सरणे - अपानवायु सुटणे ; पश्चिमद्वारे वायु बाहेर पडणे ; पादणे . वार सरतां मोठी फजीति । - दा १८ . १० . २० . होणे , सरणे - अपानवायु सुटणे ; पश्चिमद्वारे वायु बाहेर पडणे ; पादणे . वार सरतां मोठी फजीति । - दा १८ . १० . २० . ०वाजणे वारा वाहणे ; जोराचा गार वारा सुटणे . वारा वाजतां करपती ओली पिके । - दा ९ . ८ . २९ . ०वाजेल वाहील तशी पाठ करावी ओढवावी , द्यावी , वारा वाहून पाठ द्यावी , वारावाहेल तसे करावे पाठीवर घ्यावा वार्याच्या प्रवाहाबरोबर जावे , वारा बाहील त्या दिशेने जावे , वार्याच्या अनुरोधाने जहाज हांकारावे . ( ल . ) वेळ पडेल तसे , प्रसंग ओळखून वागावे . ०होणे वाताहत होणे . हळहळ बहु झाली होय संसार वारा । - सारुह ३ . ७३ . वाजता वारा लागूं न देणे किंचितहि त्रास न सोसणे ; स्वतःस अणुमात्र तोशीस लागूं न देणे ; अजीबात त्रास टाळणे . वार्याचा उपद्रव पु . हवेंतील फरकामुळे होणारी पीडा , बाधा . पटकीची सांथ . वार्याचा बुंद - पु . हवेचा अल्पांश ; किंचितहि वायुचे वाहणे ; बारीकशी झुळूक ( बहुधा नास्तिपक्षी ). वार्याची मोट - स्त्री . ( ज्याप्रमाणे वारा एका गाठोड्यांत बांधणे अशक्य त्याप्रमाणे ) परस्परांपासून दूर व भिन्न अशा अनेक वस्तु अथवा व्यक्ति एकत्र आणण्याची व ठेवण्याची क्रिया ; अनिर्बंध वस्तूंचे एकत्रीकरण . ( हे अशक्यप्राय असते ). ०बांधणे क्रि . अशक्य गोष्ट करुं जाणे . ०वार्याचे - न . ( वार्याने चालणारे ) जहाज ; गलबत ; नौका . वार्याबरोबर - शी भांडणे - अतिशय भांडखोरपणा करणे ; नसते कलह उकरुन काढणे . वार्याला लाथा मारणे - निष्फळ काम करणे . वार्यावर टाकणे - अजिबाद सोडून देणे ; टाकून देणे ; पूर्णपणे त्याग करणे ; हयगय , दुर्लक्ष करणे . वार्यावर भारे बांधणे - मनोराज्य करणे . वार्यावर वरात भुसीवर चिठी - भूसपर ठेंगा - बेजबाबदारीचे , निष्काळजीचे काम ( वरात म्हणजे पैसा देण्याविषयी चिठ्ठी . ती वार्यावर देणे म्हणजे कांही तरी करणे ); ताळमेळ नसलेली गोष्ट करणे . वार्यावर सरणे - घोडे - न . ( वार्याने चालणारे ) जहाज ; गलबत ; नौका . वार्याबरोबर - शी भांडणे - अतिशय भांडखोरपणा करणे ; नसते कलह उकरुन काढणे . वार्याला लाथा मारणे - निष्फळ काम करणे . वार्यावर टाकणे - अजिबाद सोडून देणे ; टाकून देणे ; पूर्णपणे त्याग करणे ; हयगय , दुर्लक्ष करणे . वार्यावर भारे बांधणे - मनोराज्य करणे . वार्यावर वरात भुसीवर चिठी - भूसपर ठेंगा - बेजबाबदारीचे , निष्काळजीचे काम ( वरात म्हणजे पैसा देण्याविषयी चिठ्ठी . ती वार्यावर देणे म्हणजे कांही तरी करणे ); ताळमेळ नसलेली गोष्ट करणे . वार्यावर सरणे - कुठे तरी भटकणे ; वहावत जाणे ; कांही तरी भरमसाट बोलत सुटणे . अवखळ होणे ; आडदांडपणा करणे ; स्वैर वागणे . वार्यावशी - वार्यासोई - वार्याबाग - क्रिवि . वार्याच्या गतीच्या अनुरोधाने ; प्रवाहाबरोबर ; प्रवाहाच्या दिशेने . वार्यास उभा न करणे - राहूं न देणे - न राहणे - स्वतःपासून दूर ठेवणे ; संबंध न ठेवणे ; संसर्ग टाळणे . वार्यास देणे - उपणणे ; वारवणे ; वारसंडणे . सामशब्द - वारापाणी - न . वारा व पाणी यांच्या सुलभतेमुळे क्षुल्लकत्व दर्शक दुर्लक्षित , उपेक्षित स्थिति ; अवहेलना ; उपेक्षा ; हेटाळणी ; तिरस्कार ; हेळसांड . मी बोलतो याचे उगीच वारापाणी करुन टाकूं नको . झाले बारापाणी वज्र तव भयेंचि देव कां पावे । - मोअश्व १ . १०६ . नस्त्री . निरवानिरव ; वारासार ; फेड ; भागवाभागवी ( कर्ज - वाम वगैरेची ). निरास ; निवारण ; अनिष्ट निरसन . हवापाणी ; मोकळी स्वच्छ हवा ; एखाद्या ठिकाणचे हवामान ; आबहवा . चार दिवस वारापाणी खा मग बरा होशील . [ वारा + पाणी ] वारे - न . वारा ; विशेषतः वाहणारा , हलणारा वारा . साथ ; प्रसार ; प्रादुर्भाव ( रोग वगैरेचा ). उदा० पटकीचे वारे ; खोकल्याचे वारे . ( क्रि० चालणे ; वाहणे ; वाजणे ; सुटणे ). वारी रोग्याची वाजती । दावि ३७७ . संचार ; अंगात येणे ; पिशाच्चबाधा . ( क्रि० येणे ; भरणे . ) अंगी घेऊनियां वारे दया देती । तयां भक्तांहाती चाट आहे . । - तुगा २८४२ . वारे निराळे बोले । देहामध्ये भरोनि डोले । - दा ९ . ८ . २२ . झांक ; छटा ; चर्या ; सूरत ; गुणसमुच्चय . ( विशिष्ट गोष्टीकडे कल , आवड , विशिष्ट बौध्दिक सामर्थ्य , कौशल्यदर्शक ). कारकुनीचे वारे . लहर ; लाट ; उर्मि ; प्रवृत्ति ; कल उदा० प्रीतीचे - ममतेचे - रागाचे - शोकाचे - आनंदाचे - वारे . जोम ; उत्साह ; सामर्थ्य ; आनुवंशीक ओज , तेज , रग वगैरे . उदा० तारुण्याचे - बळाचे - शक्तीचे - वारे . हिंदुलोकांत स्वातंत्र्याचे वारे कसे ते माहित नाही . - नि . अंगी भरले नूतन वारे । - विक ३ . सामान्यतः एखादी चमत्कारिक कल्पना , वेड , खूळ वगैरे . सुधारणेचे वारे महाराजांच्या डोक्यांत शिरले . - टिले ४ . ३३६ . स्पर्श ; वास . एका राज्यव्यवस्थापकाने राज्यास संपत्तीचे वारे लागूं नये म्हणून कडक कायदे केले . - नि ५४ . अंश ; भाग . त्यातले बिलकुल वारे ऐन साठीच्या अमलातहि प्रस्तुत ग्रंथकाराचे ठिकाणी आढळत नाही . - नि . आविर्भाव ; देखावा ; आव ; अवसान . चोरापुढे त्याने पहिलवानगिरीचे वारे अंगी आणण्याचा प्रयत्न केला . अर्धांगवायु ; पक्षवात . वारी अंगावरुन जाती । - दा ९ . ८ . २९ . ०फिरणे बदल होणे ; संगति लागणे ; संबंध येणे . संपत्तीचे वारे आजपर्यंत कसे ते मुळीच लागले नाही असे देश पृथ्वीवर पुष्कळ आहेत . वारे सुटणे परिस्थिति , वातावरण उत्पन्न होणे . कायदेभंगाचे हिंदुस्थानात वारे सुटले . - के १२ . ७ . ३० . ०सूत्र न. ( गो . ) पिशाच्चाचा फेरा . वारेघशी क्रिवि . उघड्यावर ; वार्यावर ; हवेवर . रसाची घागर तुळशीपाशी उतरली व वारेघशी ठेविली - खरादे ६९ . वारेमाप क्रिवि . प्रमाणाबाहेर ; भलतीकडेच ; बेअंदाज ; बेछूट . बेताल ; असंबध्द ; विसंगत ; अद्वातद्वा ( बोलणे , भाषण ). वारेलग - क्रिवि . वार्याच्या प्रवाहांत , झोतांत . कां वारेलगे पाखिरुं । गगनी भरे । - ज्ञा १३ . ३१४ . वारेहळक - वि . वारा लागून वाळलेले ; वार्यावर टाकून वाळलेले .
|