Dictionaries | References

शेंप

   
Script: Devanagari
See also:  शेप

शेंप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
śēpa or śēmpa f ई or ए A tail.

शेंप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A tail.

शेंप     

 स्त्री. शेपूट ; पुच्छ ; शेपटी . [ सं . ] सामाशब्द -
०किडा  पु. शेपटासारखा भाग असणारा किडा . यास पाय नसून हा सरपटत चालतो .
०खळी  स्त्री. विण्याच्या सुमारास जनावराच्या शेपटीजवळ खळगी पडते ती .
०चौरी वि.  शेपेचा चौरीसारखा गोंडा असलेली ( मेंढी ).
०कल्याणी वि.  स्त्रीलंपट ; कामातुर ; विषयी . ( स्त्री . )
०मोडया वि.  १ केवळ शेपूट पिळवटली असतांच चालणारा . २ ( ल . ) मठठ ; आळशी ; नालयक ; कामचुकार .
०रूट  न. एक जातीचे गवत .
०ळा  पु. १ एक किडा . २ मोठी ऊ . शेपट - स्त्री . अतिशय जोराने हाकणें , पाठीस लागणें , दामटणे ; धावडवणे . ( क्रि० काढणे . ) शेपटणे - उक्रि . शेपट काढणे दमविणे . शेपटणे - उक्रि . शेपूट पिळणे . शेपटाशेंपडा - पु . १ लांब शेपटी ; लांबलचक पुच्छ . २ ( ल . ) पाठीवर मोकळी सोडलेली वेणी . शेपटी , शेंपटी , शेंपडी , शेंपुडी - स्त्री . १ पुच्छ ; शेंपूट . २ ( ल . ) जनावर ; गाय ; म्हैस वगैरे . शेपटी - स्त्री . ( ल . ) फोकाटी ; छडी ; शिरपुटी ; शिपटी . शेपाटणी - स्त्री . शेपट ; शक्तीपेक्षां जास्त श्रम देणे . ( क्रि . काढणे . ) शेपाटणे - उक्रि . शेपटी पिळणे ; धावडवणे ; दमविणे ; फोकलणे ; शिरपटणे ; चमकाविणे . शेपडावणे - उक्रि . ( मा . ) झोडपणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP