-
स्त्री. १ योजना ; तजवीज . २ निर्णय ; निकाल ; शेवट . ३ कायद्याचे मत ; कायदा . ४ मत . तरी अझुनिवरी पार्था । सांडी सांडी हे व्यवस्था । - ज्ञा ११ . ६३१ . ५ रचना ; प्रकार . या लागी तया पार्था । विश्वतोमुख हे व्यवस्था । आली वाक्पथा । श्रुतीचिया । - ज्ञा १३ . ८८० . ६ गणती , मोजदाद . पै महोदधीचिया तरंगा । व्यवस्था धरूं नये जवी गा । - ज्ञा १० . ३०१ . ७ वर्णनसंगती . तैसे टणकोनी सर्वथा । हे ते ऐशी व्यवस्था । - अमृ ७ . ११८ . [ सं . ] व्यवस्थणें - उक्रि . ठरविणे ; निश्चित करणे . जे अतींद्रिय म्हणोनि व्यवस्थिले । - ज्ञा ११ . १५९ . व्यवस्थापक - वि . व्यवस्था करणारा ; लावणारा . - पु . कारभारी ; मॅनेजर . व्यवस्थापत्र - न . आपल्या मरणानंतर आपल्या मिळकतीची कशा प्रकारे व्यवस्था लावावी याबद्दलचा लेख ; मृत्युपत्र . व्यवस्थापन - न . व्यवस्था करणे ; तजवीज ; रचना व्यवस्थापित - वि . व्यवस्था केलेले ; नियोजिलेले . व्यवस्थित - वि . १ नीट ; चांगले ठेवलेले , रचलेले , योजलेले ( काम , वस्तु , पध्दत इ० ). २ यथायोग्य ; खरे . गुण ते ते व्यवस्थित । दोषचि मानी । - ज्ञा १८ . ७२७ . ३ पध्दतशीर ; शिस्तीचा ; बेतशीर ( माणूस ).
-
ना. तजवीज , तयारी , तरतूद , बेगमी , सिद्धता ;
-
f Arrangement. End, issue.
-
Settlement, arrangement, just disposition, establishment in suitable connection or order. 2 Used popularly in the sense of End, issue, event, fate, ultimate state. 3 A written declaration of the law; or a written extract from the codes of law, as given as the opinion of the law-officers.
Site Search
Input language: