-
पु. १ विचार ; बेत ; मनीषा . उगीच नादी लाऊन ठेवावे असा इतर सरदारांचा दरक . - ख ११७८ . २ पद्धत ; सरणी . [ अर . दर्क ]
-
पु. वंशपरंपरागत सरकारी मोठ्या अधिकाराची जागा ; श्रेष्ठ अधिकार , हुद्दा . हे आठ प्रकारचे आहेतः - दिवाण , मुजुमदार , फडणीस , सबनीस , कारखाननीस , चिटनीस , जामदार , पोतनीस . [ अर . ]
-
०दार दरकी असामी वि . दरक धारण करणारा अधिकारी . यांचे प्रकारः - फडणीस , मुजुमदार , दिवाणजी , बक्षी , सबनीस , वांकनीस , कारखाननवीस , हशमनीस , पोतनीस , गोठगस्ते , मुनशी , पागनीस , बारनीस , गडनीस , सभासद , दफ्तरदार , रक्तवान , मोईनदार , पोतदार इ० .
-
दरक mfn. mfn. timid, aftaid, [L.]
Site Search
Input language: