|
वि. जास्त ; पुष्कळ ; फार . ( ल . ) नकोसा ; नावडता . मावशींना चंद्रिका जशी अधिक झाली तशी चंद्रशेखरांना कांहीं झाली नव्हती . - निचं ११८ . अधिक मोठें ; गुरुतर . वर ; पेक्षां जास्त . उ० गुणाधिक = गुणांनीं वरचढ ; रसाधिक = रसेंकरुन अधिक , चांगली चव असलेला . जास्त ; वर - समासांत संस्कृत संख्यावाचक शब्दांच्या मध्यें . उ० एकाधिक शत . विशेष ; पटाईत ; निष्णात ; अट्टल ; असाधारण ( वाईट अर्थी - द्वाड , दांडगा , खोडकर मूल ). जादा ; वाढीचा ( महिना अधिक - मास ). [ सं . ] ०होणें संपणें ; कमी होणें . करंड्यांतलें कुकूं अधिक झालें . वाजवीपेक्षां जास्त पिकणें ; अविकणें ( फळ वगैरे ). ०अलंकार एक अलंकार ; यांत कार्यनिष्पत्तीची सामुग्री पूर्ण असूनहि कार्य होत नाहीं म्हणून उपरोधपर वर्णन असतें . उ० ज्या उदरांत सकलहि लोकत्रय सावकाश राहतसे । त्यांतचि मुनिवरदर्शन होतां आनंद तो न मावतसे ॥ - साचं ४४ . ०आगळा थोडेसें वर ; थोडें जास्त . अधिक आगळे चार रुपये लागले तरी चिंता नाहीं . ०उणा वि. कमीजास्त . लहानमोठा . बरावाईट . ०उणा - पु . मर्यादेचें उल्लंघन करण्यासारखा शब्द ; टाकून बोलणें . शब्द - पु . मर्यादेचें उल्लंघन करण्यासारखा शब्द ; टाकून बोलणें . ०प्रसंग पु. दंगामस्ती ; भांडण ; उपमर्द . अधिक प्रसंग करशील तर एका क्षणांत तुझं तोंड कायमचें बंद करीन . - अस्तंभा १२४ . ०भेट स्त्री. साक्षात्कार . - मनको . ०महिना मास - सूर्यसंक्रांतिरहित चांद्रमास ; चांद्रवर्षांत सुमारें दर तीन वर्षांनीं येणारा तेरावा महिना . हा महिना ३२ महिने १६ दिवस आणि ४ घटका इतक्या कालानंतर पुन : येतो . इष्ट शकांत ९२८ वजा करुन १९ नें भागावें ; बाकी १ , ४ , ६ , ७ , ९ , १० , १२ , १४ , १५ , १७ , १८ अशी राहिल्यास अधिक येत नाहीं ; ० , २ , ३ , ५ , ८ , ११ , १३ , १६ राहिल्यास अनुक्रमें वैशाख , आश्विन , चैत्र , श्रावण , ज्येष्ठ , आषाढ , भाद्रपद , हे महिने अधिक येतात . बारा वर्षांत चैत्र , ज्येष्ठ , श्रावण हे अधिक होतात . अठरा वर्षांनीं आषाढ अधिक . चोवीस वर्षांनी भाद्रपद अधिक . १४१ वर्षांनीं आश्विन अधिक . ७०० वर्षांनीं अधिक कार्तिक येतो . कार्तिकापुढील चार महिने अधिक होत नाहींत व आश्विनाचे पूर्वी क्षयमास होत नाहीं . - ज्ञाको ( अ ) १५२ . अधिकस्याधिकं फलम - अधिक केल्यास अधिक प्राप्ति होते ; अधिक प्रयत्न केल्यास अधिक यश मिळतें .
|