-
पु. १ खांदा ; बाहुटा ; ( मनुष्य , पशु यांच्या ) पाठीच्या वरचा , मानेच्या , पाठीमगचा भाग ( ओझें वाहणें . इ० वेळीं उपयोगांत आणतात ). ' पालखीला खांद घातला - दिल्हा .' ' खांद आला - सुजला ' २ ( ल .) सरावानें , अभ्यासानें झालेला राबता , परिचय किंवा संवय ( पाहुण्याच्या उपद्रवाची ). ( क्रि० पडणें .) ' आल्यागेल्यांचा खांद नेहेमीचा ' - खरादे . २०१ . ३ शेतीच्या तात्पुरत्या कामासाठीं आणलेला बैल ; टोणग्याच्या मेहनतीबद्दल द्यावयाचें धान्य . कडबा , भाडें , ४ स्पर्धा ; चढाओढ . ५ ओझें बहाण्यामुळे खांदीस पडलेले व्रण , घट्टा , किंवा तशीं स्थिति . ( क्रि० पडणें ; येणें ). ' बैलास खांद आला आहे .' ६ ( ल .) आधार ; आश्रय . ' खादुं मांडिजे धृती । त्रिविधा जया । ' - ज्ञा १८ . ७३१ . ( सं . स्कंध ; प्रा . खध ) ( वाप्र .) ०आवळणें -( चांभारी ) चामडे टांगल्यावर उलटें करावें लागतें . त्यावेळी साल व हिरडा मधल्या भागांत रहावा म्हणुन कतड्याच्या मानेजवळ दोरीनें आंवळतात .
-
स्त्री. ( कों . कु .) झाडाची मोठी फांदी . ( खांदी )
-
०चोराणें जुंवांखालीं खांदा न देणें . चुकारपणा करणेम . याच्या उलट खांद देणें . एखाद्याशीं खांद बांधणें , करणें - बरोबरी करणें , टक्कर देणे , मारणें ; स्पर्धा चालविणें .
-
०शिवणें ( चाभारी ) चामटे उलटें ; केल्यावर त्यांचे एक तोंड उघडें असतें त्यास शिवावें लागतें , तें शिवणें .
Site Search
Input language: