|
पु. तेली , तांबोळी , साळी , माळी , जंगम , कळावंत , डौरी , ठाकर , घडशी , तराळ , सोनार , चौगुला हे बलुत्याच्या खालच्या वर्गाचे १२ कामगार होत . ग्रॅन्टडफच्यामतें सोनार , जंगम , शिंपी , कोळी , तराळ , वेसकर , यांचा हक्क महारापेक्षां निराळा . माळी , डवर्यागोसावी , घडशी , रामोशी , तेली , भिल्ल , तांबोळी , गोंधळी यांना नारुकारुच्या उलट अशी संज्ञा आहे . शेतकर्यांकडून यांना जें धान्य हक्क म्हणून मिळतें त्याचें प्रमाण ठराविक नाहीं . यांतील सोनार सरकारी नाणीं पारख करणारा पोतदार होय . तराळ म्हणजे पाटलाजवळ सतत हजर असणारा , सरकारी अधिकार्यांची सरबराई करणारा , त्यांचें सामान वाहणारा महार होय . बाराच्या बारा अलुते कोठल्याहि खेड्यांतून क्वचितच सांपडतात . कोठें कोठें वाजंत्री , गारपगारी वगैरे नवीन अलुतेदार आढळतात . बलुता पहा . [ बलुता द्वि . ]
|