Dictionaries | References

अलोलिक

   
Script: Devanagari

अलोलिक

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : ठहराव

अलोलिक

  न. 
   अलोलकी पहा . सर्वत्रांसी भजनाची अलोलिक । - सप्र ८ . ९१ . - वि . चमत्कारिक ; आश्चर्यकारक ; नावीन्याचें ; कौतुकास्पद ; अपूर्व . रामावेगळें अलोलिक । तां मज दिधले तिन्ही लोक । - वेणासीस्व १ . ३८ .
   प्रेमळ ; आवडतें ; ह्रदयंगम ; लडिवाळपणाचें ( भाषण , चालरीत , वागणुक ). पुढील कथा अलोलिक । - एरुस्व १० . १०० .
   सुंदर ; नाजुक ; सुकुमार ; उत्कृष्ट ( माणूस , स्वभाव ). ते महालावण्यरुपकळा । श्रृंगारें आथिली मंगळा । चंद्रवदनीं तेजकळा । अलोलिक ॥ - कथा २ . ११ . २० . [ सं . आलिलिक ].
०तालोलीक  न. लाड ; लडिवाळपणाची वागणूक ; कोड पुरविणें ; कौतुक करणें ; खुशामत करणें ; मिजास पुरविणें . मी नवर्‍याचें अलोलिकतालोलीक कोठपर्यंत करुं ? [ अलोलीक द्वि . ].
०रचना  स्त्री. अपूर्व रचना - घडण . ( विशे . सृष्टीची ) अलोलिक रचना दाखविली । - व्यं . १० [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP