|
वि. आंतील ; अंतर्गत . अभ्यंतर पहा . ०प्रयत्न पु. ( संगीत ) गातांना प्रत्यक्ष शब्दोच्चार किंवा स्वरोच्चारण ( बाह्य प्रयत्न ) करावयाच्या अगोदर गवई कंठ अगर फुफ्फुसें फुगवून साफ करतो ती क्रिया ; आभ्यंतरप्रयत्नाचे चार भाग आहेत - स्पृष्ट , ईषत्स्पृष्ट , विवृत , संवृत . बाह्यप्रयत्नाचे ११ प्रकार आहेत - विवार , संवार , श्वास , नाद , घोष , अघोष , अल्पप्राण , महाप्राण , उदात्त , अनुदात्त , स्वरित . [ सं . आ + अभि + अंतर ]
|