|
पु. पाठवणूक ; रवानगी . चित्तांत आल्यास माझें विनंतीपत्र व जिन्नस इर्साल करावे . - रा १ . १४७ . सरकारी खजिन्यांत भरावयाचा पैसा , पाठविण्याचा पैका . यावर तमाम लश्करास व वाणियांस ताकीद करुन इर्साल पोहोंचवून दिल्हा . - इम १९५ . - वि . अगदीं उत्तम दर्जाचा ; गुणानें अत्युकृष्ट ; ( आंबा , इतर फळें व त्यांचीं झाडें यांस म्हणतात , तसेंच फळें , फुलें , झाडें , बिया अत्युकृष्ट समजला जाणार्या बाहेर पाठविण्या योग्य यानांही हें विशेषण लावतात ). निवडक ; वेचक ; अस्सल ; अव्वल . अट्टल ; बेरकी ; वस्ताद ; पक्का ( लबाड माणूस , चोर , भामटा , खोटा माणूस वगैरे ) ( अर . इर्साल = दूतमंडळ ; पत्रप्रेषण ] ०नामा पट्टी - पुस्त्री . खजिन्यांत भरावयाच्या पैशांचा तपशील ; अथवा सरकारांत भरावयाच्या किंवा भरलेल्या रकमेची यादी . ०भरणा पु. महालाकडून खजिन्यांत पाठविलेला वसूल , पैसा .
|