Dictionaries | References

उडविणें

   
Script: Devanagari
See also:  उडवणें

उडविणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   uḍaviṇēṃ v c Active or causal form of उडणें q. v. throughout. 2 To scatter, disperse, cast abroad; to cause to fly or run in every direction. 3 To spend lavishly; to squander. 4 To turn off; to shuffle or evade. 5 To treat with slight and scorn; to reject contemptuously.

उडविणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   Scatter, squander. Turn off, shuffle, evade. To treat with slight and scorn.

उडविणें

 उ.क्रि.  
   उडणें याचें प्रयोजक ; उडणें पहा .
   दूर फेंकणें ; अस्ताव्यस्त करणें ; विस्कळित करणें ; चारी दिशांस उधळून लावणें ; पळवून लावणें . मुकुट शिरींचा उडविला । - मोदोहारामायण ६९ .
   उधळपट्टी करणें ; बेसुमार खर्च करणें . आपल्या नादीं लागून हवा तेवढा पैसा उडवील असें तिला वाटलें . - विवि १० . ५ - ७ . १२३ .
   टाळणें ; अव्हेरणें ; सोडणें ; टाकून देणें .
   हेटाळणें ; अव्हेर करणें ; झिडकारणें .
   चोरणें ; लांबविणें ; नाहींसें करणें . हातवह्या फिर्यादीनें उडविल्या . - विक्षिप्त ३ . ९५ .
   मारणें ; आघात करणें ; निर्गुणास जन्म कल्पिला । अथवा निर्गुण उडविला ॥ - दा ९ . ३ . २६ . शत्रूवर नेम धरुन सोजीर उडवितां येतील . - इंप १५० . चाबूक उडविणें , चाबकाचे फटके मारणें . भटजीचे अंगावर चाबूक उडविले . - इंप ८६ .
   चोरुन नेणें ; पळवून नेणें ; तिला उडवून नेण्याचा प्रयत्न करणें ही गोष्ट श्लाध्य आहे . - विवि १० . ५ - ७ . १२३ .
   आटोपणें ; जलद काम करणें ; त्वरित संपविणें . लॅटिन भाषांतर विद्यार्थ्यास दिलें असतां तें जॉन्सननें कसें उडवून दिलें याविषयीं मागें सांगितलेंच आहे . - नि ६५६ .
   फजीत करणें . नका आमची जास्त उडवूं - चंद्रग्रहण . ४० .
   काढून , हांकून लावणें . आपण स्वत : टोळीचा नायक होऊन तुम्हास उडवून देणार नाहीं . - कोरकि २७८ . [ सं . उद + डी - डायय - उड्डायन ; प्रा . उड्डवण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP