Dictionaries | References

उमाळी

   
Script: Devanagari
See also:  उमाळा

उमाळी

   पुस्त्री .
   मळमळ ; पोटांतील खळबळ ; कळमळ ; उमळ .
   हुंदका ; उकळी ; आवेग ; उसळी ; लहर ( राग , प्रेम , दु : ख , शोक वगैरे विकारांची ). स्वानंदाचे उमाळे देती । सारासार विचारें तळपति ।
   तीव्र इच्छा . देहे खंगतां सर्व जाळी उमाळी . - दावि १७८ .
   उकळी ; कढ ; ऊत ( पाणी , दूध वगैरे पदार्थांचा ).
   सुटका ; सोडवणूक ; मुक्तता ; मोकळीक ( एखादा धंदा , कार्य वगैरेतून ). ( क्रि० पडणें ).
   लोट ; गर्दी ; हल्ला ; उठाव . तो देखौनि यादवांचा उमाळा । एरी सिंहनादु दीन्हला ॥ - शिशु १०४१ ; तैसे दृश्याचे डाखळे । नाना दृष्टीचे उमाळे । - अमृ ७ . १४३ .
   उद्भव ; जोर ; प्रभाव . जेयांचा देखौनि उमाळा । पळे महामोहाचा पाळा । - शिशु ३८४ . भंगोनि विघ्नांचा उमाळा . - मुआदि ३५ . १०२ . [ सं . उद + मूल ; तुल० का . उम्मलु = श्वास घेण्यास येणारी अडचण , कफ ] ७ ( काव्य . ) ज्वाला ; झोत ; लोळ ; तरंग ( आग , वीज वगैरेचा ). कोटी रविशशि तेज उमाळा ॥ - दावि ३३५ . जैसे कल्पांतविजूचे उमाळे । - रावि १ . १२ . [ का . उम्मळ = उष्णता ]
०पडणें   अतिशय पाऊस झाल्यामुळें पिकें कुजावयास लागणें . उमळ पडणें पहा . उमाळीं , उमाळीस , उमाळ्यां , उमाळ्यास पडणें , येणें उघडकीस येणें ; माहीत होणें ; दिसणें ; आढळणें ; बभ्रा होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP