Dictionaries | References

ओंढवणें

   
Script: Devanagari

ओंढवणें     

अ.क्रि.  १ आपोआप घडणें - कडे जोरानें वळणें ; नाइलाजानें ओघास येणें ; जोरानें हलणें , सरणें , येणें ; गुदरणें ; प्राप्त होणें ; झोका बसणें ; अकस्मात येणें ; ( दैव , मृत्यु , संकट , पीडा , उपाधि इ० संबधीं योजितात व त्यांत प्रेरकत्व अंधीश्वरत्व गर्भित असतें ). ' वाटे ओढवला प्रळयकाळ । ' ' दुःख सुख जें ओढवले तें भोगणें प्राप्त .' ( टीप - दैव , प्रारब्ध या अर्थी योजले असतां नेहमींच दुःख किंवा संकट असा अर्थ होत नाहीं . जसें - मूर्ख जरी असला तरी दैव ओढवले म्हणजे ऐश्वर्य भोगाव्यास सांपडतें .) २ ( व्यापक ) निश्चयपूर्वक , वेत ठरवून अंगावर येणें , कोसळणें ( संकटे , शत्रु रानटी जनावरें , भिकार अथवा अपरिहार्य अडचनी वगैरे संबंधानें योजतात ); भोआस येणें . ३ वळणे ; जाणें ; कलणें ; प्रवृत्त होणें ; ( कोणत्याहि दिशेकडे ) ओढणें ; होरा वाहणें ( मन , अंतःकरण , चित्त वगैरे संबंधानें योजितात ); ( रागानें व निंदापुर्वक ) आगमन करणें ; येणें . ( आपल्या स्वतःची धाड आणणें ). - सक्रि . ( ओढविणें ) १ ( काव्य ). ( एखादा पदार्थ घेण्यासाठीं ) हात पुढें करणें . ' ओढवितो हात भाजिच्या पाना । ' ( सं . वहू ; तुल० का . ओडु = हात पुढें करणें ) २ आटवून टाकणें ; क्षीण करणें . ' शरीर ओढवी पांचाजणा । म्हणवी पवित्र कुलांगणा । ' - मुसमा १५ . २२ . ( ओढणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP