|
पुस्त्रीन . १ नवरात्रांत ( अगर इतर वेळीं ) देवीच्या वरील मंडपीला टांगलेले कागदाचे नक्षीदार वाटोळे तुकडे . २ वरील आकाराच्या तळलेल्या पुर्या ; तेलच्या फुलोरा . ' कृष्णालागी तेलवणें । आणलीं कडकडीत कडकणें । ' - एरुस्व १५ . ९० . - वेसीस्व ८ . ११७ . अ.क्रि. १ वाळणें ; सुकणें ; कडकडीत होणें ( कापड , भाकर , इ० ) २ अतिशय सुकल्यानें तडकणें ; उलणें . ३ शुष्क होणें ; आक्रमण ; करपणें ( थंडीनें , उष्णतेनें उभें पीक इ० ) ४ पक्कें होणे ; वाळणें ; कापणीला तयार असणें ( गवत , धान्य इ० ) ५ अशक्त , दुबळें होणें ( माणुस , जनावर ). ६ कडकड वाजणें ( चावतांना भाकरी ; कापतांना गवत ; जळतांना काटे , वाळलेले कपडे , कागद इ० ). ' बहु वाद्यें मेळा कडकत भरें व्योम भरलें । ' - दावि २२३ . ७ खूप रागावून मोठ्यानें भांडण करणें ; ताशेरा झाडणें . गोदूबाई पुन्हां कडकल्या .' - हांकाध ९९ . ८ कडकड वाजणें ; गडगडाट होणें ( मेघ , वारा , वीज यांचा ). ' वीज कडकडली .' ' तया तेजापेक्षां कडकत बळें वात सुटला । ' - दावि २५५ . ९ महाग होणें ; जास्त वाढणें ( बाजारभाव ). - शे . ८ . १८७ . कडकून सांगणे - बोलणें - मोठ्यानें , जोरानें सांगणें ; बोलणें , ओरडणें , शिरा ताणून बोलणें . ( कडक )
|