|
स्त्री. १ कमळाचें झाड . २ कमल ; कमलपुष्प . ' किं रविकिरणीं कमळणी विकासति । दाता देखतां याचक हर्षती । '; ' मुक्तता होऊं पाहे , कमळिणीपासूनि भ्रमरा । ' - होला १६ . ( सं .) ०वरचा पु. १ कमलाच्या पानावरील पाण्याचा थेंब . २ ( ल .) कमलाच्या पानावर पाण्याचा थेंब पडला असतां त्याच्या गुळगुळीतपणामुळें तो वाटोळा होऊन गडगडत पडुन जातो यावरून आयुष्य , संपत्ति , वैभव , ऐश्वर्य वगैरेची क्षणभंगुरता व अनिश्चितता दाखविण्याची काव्यांतील उपमा . ३ मन , हेतु , वचन यांचें चंचलत्व , असत्यता , बेभरवंसा दाखविण्यासहि योजतात . पाण्यावरचा बुडबुडा पहा . बिंदू पु. १ कमलाच्या पानावरील पाण्याचा थेंब . २ ( ल .) कमलाच्या पानावर पाण्याचा थेंब पडला असतां त्याच्या गुळगुळीतपणामुळें तो वाटोळा होऊन गडगडत पडुन जातो यावरून आयुष्य , संपत्ति , वैभव , ऐश्वर्य वगैरेची क्षणभंगुरता व अनिश्चितता दाखविण्याची काव्यांतील उपमा . ३ मन , हेतु , वचन यांचें चंचलत्व , असत्यता , बेभरवंसा दाखविण्यासहि योजतात . पाण्यावरचा बुडबुडा पहा .
|