Dictionaries | References

करळ

   
Script: Devanagari
See also:  करळा

करळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   
   karaḷa n करळा m The half-burned grass of a kiln underneath the pitchers, bricks, tiles &c.: also a single काडी or stalk of it.

करळ

   काळ्या जमीनीचा एक प्रकार ; हिच्यांत भूसमुशीत पणा नसून ही फार चिकट असते . हिच्यांतुन पाणी झिरपून जात नाहीं . पाणी पडलें असतां हिच्यावर मिठासारखा पांढरा क्षार येतो . हिचे काळा करळ व पांढरा करळ असे दोन प्रकार आहेत . ( का . करल = खारटपणा ; क्षारता .)
 वि.  ( व .) महाग ; कडक ; वाजवीपेक्षां जास्त ( किंमत ).' बाजारांत उशिरां गेल्यानें गहुं जरा करळ पडले .'
  न. कुंभाराच्या भट्टींत कौलें . विटा वगैरेच्या खाली घातलेलें , अर्धवट जळलेलें गवत . २ अशा गवतांची एक काडी .
  पु. ( सोनारी ) फुलांचा ठसा . (?)
  स्त्री. छिद्र , ( विरळ विणलेल्या रोवळी , सूप पाटी यांच्या मधील ) फट ; चीर . ( सं . करल = वेळू ; किंवा कराल = रुंद , उघडें )
  स्त्री. ( राजा .) तांदूळ व इतर धान्याचें तूस , भुसा , टरफल . करल पहा .
 वि.  ( व .) उतरतें ; करतें . ' झोपडीचें छप्पर जास्त करळ असल्यानें पाणी थांबलें नाही .'
  पु. वाळुमिश्र , ठिसुळ दगड ; बरड , कड . ( सं . करक ) ०लागणें -( वांई ) पाभरीच्या फणानें जमीन जास्त खोल उकरली जाणे .
०जाणें   होणें - क्रि . एका अंगाला कलणें , जाणें ( जूं , धुरी , नांगर , गाडा , तराजु , तराजुची दांडी यासंबंधी योजतात ). हा शब्द शेतकरी , लोकांत विशेष रूढ आहे .
०धरणें   क्रि . ( नांगर ) आडवा धरणें .
०चालणें   आडवें जाणें , आडवें निघणें . यांच्या विरुद्ध शेव ( उभें ) जाणें , चालणें .

करळ

   करळ चालणें
   आडवे जाणें
   आडवे, तिरपे चालणें
   वाकडा निघणें. याच्याविरूद्ध शेव चालणें, जाणें म्‍हणजे सरळ जाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP