Dictionaries | References

कांजू

   
Script: Devanagari

कांजू     

 पु. काजूचें - जांभींचें झाड व फळाची बी . हें झाड रानांत , डॊंगरांत - विशेषत ; मलबार , गोमंतक , मालवण या प्रांतीं होतें . यांच्या तांबडा , पिवळा व पांढरा अशा जाती आहेत . फळ मऊ असून पुढें बी असते . तिची साल कठिण असून आंत बिब्यासारखा चीक असतो . सालीच्या आंतील गोळ्यास काजूगोळा म्हणतात . पिकलेला पळास जांब म्हणतात व ते खातांत बी भाजून अगर वाळवून वरील साल काढून खातात . मिठाई इत्यादी पदार्थांत बीचा उपयोग करतात . बीयांचा चीक तारवांच्या तळास लावतात . - वगु २ . २९ . काजूच्या फळांची दारू होते . कच्चा फळाचा चीक पायास होणार्‍या चिखल्या रोगावर उपयोगी पडतो . - कृषि ७३७ . धातूस डाक लाविण्यासाठी याचा रस उपयोगी आहे . ( मलायी , कायु ; फ्रें . अकाजु ; पोर्तु अकाजु ; इं कॅशु हिं गु . काजें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP