|
स्त्री. १ वाराणशी ; बनारस . एक शहर . २ कालिंगड ; टरबुज इ० लावण्याचा मळा , जागा ; तें पीक ; वेल ( वाप्र .) ०ची दाखविणें - लहान मुलांना कानाशीं हातानें दाबुन धरुन वर उचलणें व सुर्यांची पिल्लें दाखविणें . वाट दाखविणें - लहान मुलांना कानाशीं हातानें दाबुन धरुन वर उचलणें व सुर्यांची पिल्लें दाखविणें . ०रामेश्वराचें फारच मोठे अंतर . अंतर फारच मोठे अंतर . ०स नेणें - गंगेच्या पाण्यानेंच गंगेचें तर्पण करणे ; निरुपयोगी गोष्ट करणें . म्ह० १ काशीस गेला काशीदास , मथुरेस गेला मथुरादास = वारा पाहुन पाठ देणारा ; लुच्चा , कार्यसाधु , माणसास म्हणतात . २ काशी केली वाराणशी केली कपाळाची कटकट नाहीं गेली = वैतागानें यात्रेस गेल्यावरहि संसाराची कटकट न सुटणें . ३ काशीस जावें नित्य वदावें = एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानें केव्हां तरी तो गोष्ट घडुन येईल असा विश्वास . ' काशीस जावें नित्य वदावें असा निदिध्यास मुमुक्षुनीं धरावा ...' - अगर ३ . ९ . सामाशब्द - गंगा नेणें - गंगेच्या पाण्यानेंच गंगेचें तर्पण करणे ; निरुपयोगी गोष्ट करणें . म्ह० १ काशीस गेला काशीदास , मथुरेस गेला मथुरादास = वारा पाहुन पाठ देणारा ; लुच्चा , कार्यसाधु , माणसास म्हणतात . २ काशी केली वाराणशी केली कपाळाची कटकट नाहीं गेली = वैतागानें यात्रेस गेल्यावरहि संसाराची कटकट न सुटणें . ३ काशीस जावें नित्य वदावें = एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानें केव्हां तरी तो गोष्ट घडुन येईल असा विश्वास . ' काशीस जावें नित्य वदावें असा निदिध्यास मुमुक्षुनीं धरावा ...' - अगर ३ . ९ . सामाशब्द - ०कर पु. १ काशीचा रहिवासी . २ काशीयात्रा केलेला . ३ ( ल .) अत्यंत लुच्चा माणुस ; काशीकर गुंड ह्यांच्या पेक्षां नाशिककर शंभरपटीनें लुच्चा असतो . ' शंभर काशीकर एक नाशिककर .' ०गोत न. संबंध जात ; जातगंगा ( एखाद्या निर्णयार्थ भरलेली ). ०चा पु. काशी येथील काळभैरव ; काशींत केलेल्या पापांबद्दल हा शिक्षा करतो अशी समजूत . कोतवाल पु. काशी येथील काळभैरव ; काशींत केलेल्या पापांबद्दल हा शिक्षा करतो अशी समजूत . ०चा पु. , काशी येथें तयार होणारे व त्यांत रामायणांतील प्रसंगांचीं चित्रें काढली आहेत असें वस्त्र पट कापड ; हा फार मोठा असतो त्यावरुन . ( ल .) - वि . लांबलचक ; कंटाळवाणें ; त्रासदायक ( गोष्ट , भुषण , आर्जव , चरित्र ). ( क्रि०काढणे ; आणणे ). पट पु. , काशी येथें तयार होणारे व त्यांत रामायणांतील प्रसंगांचीं चित्रें काढली आहेत असें वस्त्र पट कापड ; हा फार मोठा असतो त्यावरुन . ( ल .) - वि . लांबलचक ; कंटाळवाणें ; त्रासदायक ( गोष्ट , भुषण , आर्जव , चरित्र ). ( क्रि०काढणे ; आणणे ). ०चा पु. अट्टल लुच्चा ' अशा वेषधारी गुरुबरोबर जें चेले असतात तेहि काशीचे सोदे असतात .' - व्यनि ५० . सोदा पु. अट्टल लुच्चा ' अशा वेषधारी गुरुबरोबर जें चेले असतात तेहि काशीचे सोदे असतात .' - व्यनि ५० . ०फळ न. काळा - तांबडा भोपळा ; गंगाफळ ; चक्की ; हा भोपळा बसकट व करवेदार असुन रंग हिरवा , पांढरा , शेंदरी असतो . वेलाची वाढ कमी ; दुसर्या भोपळ्यापेक्षां याची भाजी कमी गोड असते . ०माल ( तंजा ) मोहर . ०यात्रा स्त्री. १ काशीची तीर्थयात्र . २ ( सोंगट्यांचा खेळ ) कवड्याचें दान दहा किंवा पंचवीस तीन वेळां लागोपाठ पडलें असतां तें फुकट जातें त्यावेळेस म्हणतात . ३ ( बायकी ) अल्पवयी वधूवर एकमेकांस भेटली किंवा जवळ आलीं असतां थट्टेनें म्हणतात . ०शिक्का - वि . काशीच्या टांकसाळींत पाडलेला रुपया .
|