|
उ.क्रि. १ ( गवत कापतांना होणार्या ' खचखच ' आवाजावरुन किंवा मनुष्याला फार धम झाल्यावर तो आवाज करतो त्यावरुन ) तोडणें ; साकटणें ; सट्दिशी कापणें ; सपासपा तोडणें . २ वेगानें , आवेशाने धसफस करुन खेंचणें , ओढणें , पकडणें , बांधणें , ओरडणें ; ( सामा .) मोटःया आवेशानें किंवा फसफसीनें कांहीं करणें ( याचा उपयोग अनिर्बंध करतात ); कांही क्रियापदांच्या मागें खचाटून हा शब्द लावला म्हणजे त्याचा अर्थ जास्त जोरानें असा होतो . जसें :- खचाटून ओढणें , बांधणे , आवळणे , ताणणे , खेचणें , झाडणें , जेवणें , मरणें वगैरे . उत्सुकता , तडकाफडकी , आवेश , नेट , वेग इ० चा बोध या शब्दावरुन होतो ; या शब्दाचा उपयोग कचकाविणे रगडविणें , रपाटणे , दपटणें इ० शब्दाच्या अर्थाशी जुळण्यासारखा करतात . ( ध्व . खच् )
|