-
न. १ तोंड ; दिशा ; संधान ; नेम ; रोख . मोरच्याचे धोरण किल्ल्यावर आहे . महागिरीचे धोरण कोणत्या बंदराकडे आहे ? २ केवळ नजरेने पाहून ( एखाद्या गोष्टीच्या ) स्वरुपाविषयी केलेला अंदाज , अजमास ; तर्क ; अटकळ बांधण्याची बुद्धीची चतुरता ; खरा तर्क ; अनुमानशक्ति . याच्या बोलण्याचालण्यावरुन हा चोर असेल असे माझ्या धोरणांत येते . हे शेत चार खंडी पिकावे असे आम्हांस धोरण दिसते . ३ ( बोलतांना , एखादी गोष्ट करताना करावयाचा ) मागचा पुढचा विचार ; पोंच ; संधानरुप अंतःकरणवृत्ति ; सारासार विचार . पूर्वी बोललो काय आणि आतां बोलतो काय हे धोरण त्यास राहात नाही . ४ ( एखाद्याच्या भाषण , वर्तन इ० कांवरुन त्याच्या ) उद्देशाची , अंतस्थ हेतूची तर्काने कळून येणारी दिशा , रोंख , स्वरुप . हा बोलण्यांत साधुपणा दाखवितो पण चाचे धोरण निराळे आहे . ५ सावधानतेची नजर ; दृष्टि ; लक्ष्य ; काळजी . हे गडी काम करितांना जोगवरील तर तुमचे धोरण तिकडे असू द्या . ६ ( मनाचा , विचाराचा ) कल ; झोंक ; रोख . त्याचे प्रपंचाकडे धोरण . त्याच्या अंतःकरणाचे धोरण कळत नाही . ७ ( एखाद्याच्या अंगी असलेली एखादे काम करण्याची ) हातोटी ; विशिष्ट पद्धत ; सरणी ; शैली . नाना फडनीसांचे राज्य करण्याचे धोरण दुसर्यास येणार नाही . ही कशाची पतिव्रता , पतिव्रतेचे धोरणच निराळे . ८ धारा ; व्यवहार इ० कांतील संप्रदाय ; वळण ; वहिवाट . जसे - दरबारचे धोरण ; सभेचे धोरण . ९ पूर्वापार चालत आलेली पद्धत ; मोड ; रीत . जसे - लिहिण्याचे - हिशेबाचे धोरण . १० - पु . मार्ग ; रस्ता . की तेथ अनुभवाच्या पाउली । धोरणू पडिला । - ज्ञा ६ . १५४ . [ सं . धूर = अग्रभाग ; किंवा सं . धारणा ; किंवा सं . धुर = जाणणे ; सं . धोरण = वाहन ? ]
-
०शुद्ध वि. बिनचूक धोरणाचा ; धोरणाला धरुन असलेला ; पद्धतशीर . [ धोरण + शुद्ध = बरोबर ]
-
ना. चाल , नीती , पद्धत , वागणूक ( पूर्वजांचे धोरण );
-
ना. अनुमान शक्ती , दूरद्दष्टी , पोच , मागचा - पुढचा विचार , विचारपद्धती ;
Site Search
Input language: