|
पुस्त्री . टिपूरखेळ पहा . टिपरखेळा - पु . टिपूरखेळा पहा . पुस्त्री . नगार्यावर टिपर्या वाजवून खेळावयाचा नाच . टिपूरखेळा - पु . वरील खेळांत नाचणारा . पु. १ करमणुक ; क्रीडा ; मौज ; केलि ( चित्तिविनो - दार्थ केलेली ). २ खेळणें - णीं ; खेळण्याची वस्तु ( बुद्धिबळें , सोंगट्या , भोंवरा , गोट्या इ० ). ३ तमाशा ; देखावा ; प्रदर्शन . ४ अभ्यास ; मेहनत ( बुद्धीचा , इंद्रियांचा ); व्यापार ; क्रिया ; चलनवलन ( यंत्रानें ). ५ खेळण्याची पाळी ( एखाद्या खेळांत ). ६ चाळा ; कृति ; खावडाव ; वाईट कृत्य ' म्हणे वामसरा घात झाला असारे । तुझे माउलीचेचि हे खेळ सारे । ' - वामन भरतभाव १७ . ७ नाटकाचा प्रयोग . ८ लीला ; कृपा . ९ ( ल .) लढाई ; युद्ध .' उलटेल जरी हा खेळ । ' - संग्रामगीतें ४७ . १० . ( गो .) विशेषत ; जुगाराचा खेळ ; जुगार . ( सं . खेल ; हिं . पं . खेल ; बं . खेला सीगन फ्रेंचजिप्सी खेल .) ( वाप्र .) ०करणेम - उडवणें ; उधळणेम ; बेपर्वा खर्च करणें ; घोटाळा अववस्था करणेम ; नासणें ; बिघडविणें . ०करणें खेळणें मांडणें - चांगला खेळ किंवा काम करणें ; एखादी हुषारीची किंवा शिताफीची गोष्ट साधणें . खेळणें - अक्रि . १ क्रीडा , मौज करणें , स्वतःस रमविणें . म्ह० खेळेल तो पोळेल . २ गमणें ; अळंटंळ करणें ; माशा मारीत्र बसणें . ३ एखादा खेळ खेळणें . ४ वाद्य वाजविणें . ५ ( मूतसंचारामुळें ) इकडेतिकडे उड्या मारणें . ६ हळु हळु हालणें ; झूळझुळणें ( एखादी वस्तु वार्यामध्यें किंवा सुर्याकिरणें पाण्यामध्यें ). ' किल्ल्याभोंवती ; पाणी खेळत असतें .' ७ व्यापार करणें ; चालणें ; चालत असणें ; चलनवलन करणें ( यंत्र ). लावणें मांडणें - एखाद्या कटाचा किंवा वाईट मसलतीचा पाया घालणें . ०व वि ) णें - सक्रि . १ क्रियेंत , व्यापारांत चालु ठेवणें ; चालवणें ; हलविणें . ' स्वमायेचें आडवस्त्र । लावूनि एकला खेळवी सुत्र । ' - ज्ञा . १८ . १३०३ . २ नाचविणें ; आपल्या मर्जीप्रमाणें वागावयास लावणें . ' जो ब्रह्मादिकां खेळवी अणंगी परी । ' - शिशु १ . ३ काम सुरु ठेवणें ( यंत्र ; वाफेचें यंत्र , हत्यार इ० चें ). ४ रमविणें . सामाशब्द - ( वि ) णें - सक्रि . १ क्रियेंत , व्यापारांत चालु ठेवणें ; चालवणें ; हलविणें . ' स्वमायेचें आडवस्त्र । लावूनि एकला खेळवी सुत्र । ' - ज्ञा . १८ . १३०३ . २ नाचविणें ; आपल्या मर्जीप्रमाणें वागावयास लावणें . ' जो ब्रह्मादिकां खेळवी अणंगी परी । ' - शिशु १ . ३ काम सुरु ठेवणें ( यंत्र ; वाफेचें यंत्र , हत्यार इ० चें ). ४ रमविणें . सामाशब्द - ०कर वि. १ इकडे तिकडे खेळण्यास योग्य ; खेळण्याच्या वयांत आलेल्या . ' दे गे माळणी फुलांचा झेला । माझा नातु खेळकर झाला । ' २ खेळाडु ; मौज्या ; आनंदी . ३ आगलाव्या ; कळलाव्या ; खेळ्या ; कज्जेदालाल . ०करी पु. तमासगीर ; चित्रें दाखविणारा ; मांठ्या लोकांचीं सोंगे आणणारा ; बहुरुपी ; दशावतारी . ०कुडी स्त्री. १ खेळण्याची चेष्टा ; माकडचेष्टा . २ चळा ; क्रीडा ; युक्ति ; मौज ; थट्टा ( मनापासुन केलेल्या कृत्याच्या उलट ). ' खेळकुडीनें कोणी चोर म्हटलें तरी त्याचा राग मानूं नये .' ०कुली - ळी - स्त्री . उपवनांतील पाण्याचे लहान लहान पाट . खेडकुळी पहा . ' रत्नबद्धा खेळकुळिआं जवळी । ' - दाव १५९ . ' चित्रविचित्र खेळकुलिया । ' - मुआदि २९ . ५० . खेळकु - गड - गर - वि . १ खेळाडु ; मौज्या . २ मौज करणारा ; क्रीडा करणारा ; विनोदी ; विदुषक . ३ खेळण्याचें वय झालेलें ( मुल ). ०खंडोबा पु. नाश ; सर्वस्वी बिघाड ; पुर्ण सत्यनाश ; धुळघाण ( खंडोबा , झाडाच्या अंगांत संचार करुन त्यास रानोमाळ नाचावयास व गडबडा लोळावयांस लावतो यावरुन ). ( क्रि० करणें ). ०खाना पु. खेळण्याचा अड्डा ; क्लब . ' वयोवृद्ध कामागार सकाळसंध्याकाळ ..... दरबारंत , खेळ . खान्यांत ...... जसा वीरमंत्र देतील .....'- टि १ . ४१९ . ०गड पु. १ खेळांतील सोबतो . २ - स्त्री . ( कों .)' खेळांतील सोबत किंवा मत्री . ' त्यांची व याची लहानपणापासुन खेळगडी आहे .' ०गड्या वि. ( राजा .) खेळांत किंवा गमतींत व्यर्थ वेळ घालविणारा ; खेळ्या ; आळशी ; छचोर . खेळणी - स्त्री . १ खेळणें , क्रीडा करणें . २ खेळाचा दिवस . ( व .) सुटीचा काल ' शाळा सुरु झाल्यापासुन ४।५ दिवस खेळणीच असते .' खेळणे - न . १ खेळण्याची वस्तु . २ लहान मुलांच्या पाळण्यावर बेगड , कागद , कापडाच्या , चिमण्या इ० वस्तु बांधातात त्या . ३ सहज प्राप्त होणारी वस्तु . ' आम्हा केलें परब्रह्मा खेळणें । ' - एभा १८ . ३९५ . खेळणें ( त ), रांगणें ( तें ) - न . मकरसंक्रांतीच्या वेळेचें एक व्रत , वसा ; एक स्त्रीनं दोन नारळ घेऊन . ' खेळतें घ्या रागांतें घ्या ' असें म्हणुन दुसर्या स्त्रीस तें नारळ द्यावयाचें व नंतर दुसरीनेंहि असेंच म्हणुन दोन नारळ पहिलीला द्यावयाचे . खेळतारांगता - वि . १ खेळण्याच्या व रांगण्याच्या वयांत आलेला ( मुलगा ). २ शरीरास मोकळी हालचाल करतां येईल असा ; अघळपघळ ( वस्त्र , दागिना ). ३ खेळतां येईल असा नेमस्त ; हलका ; बेताचा ( ताप , देवी , गोंवर , कंजिण्या ). खेळतें वारें - न . देव किंवा भुत यांचा जोराचा संचार , अवसर ( यानें भविष्य किंवा शकुन समजतो अशी समजुत आहे .) ०त्या स्त्रीअव . देवींचा ( फोड्यांचा ) एक प्रकार . देवी पहा . देवी स्त्रीअव . देवींचा ( फोड्यांचा ) एक प्रकार . देवी पहा . ०वणा वि. खेळासाठी किंवा चेष्टामस्करीसाठीं ठेवलेला ; बगलबिल्ली ; खुषमस्कया = विदुषक ( माणुस , प्राणी , वस्तु , खेळणे , क्रीडामृग इ० ) ०वणी स्त्री. प्रिया ; मैना ; लाकडी स्त्री ( विलासी स्त्री किंवा नानाप्रकारचें खेळ खेळुन पुरुषास आपल्या व्यसनांत अडकविणारी स्त्री ); स्त्रीस लडिवाळपणें म्हणावयाचा शब्द . ०शेपणा पु. ( राजा .) आळशीपणा ; अळंटळंपणा ; रेंगाळण्याची किंवा गमण्याची प्रवृत्ति ; खेळगडीपणा . खेळा , खेळि ( ळी ) या , खेळ्या - वि . ( कों . राजा .) १ शिमग्यांत दवाच्या पालखीबरोबर जाणारे , यांचे कापडखेळे व डपखेळें असे दोन प्रकार आहेत ; सोंगाड्या ; बहुरंग . ' पूर्वी खेळे बहुत जाहलें सृष्टी । ' - ह . १३ . ४६ . २ लग्नांत खेळ खेळणारा . ' तो वीरराज जयाम्चा खेळा । ' - शिशु ९९८ . ३ नेहमीं भलत्यासलत्या कामांत किंवा अन्यायाच्या कृत्यांत गुंतलेला ; आगलाव्या ; कळलाव्या ; चुगलखोर . ४ फंदिफितुर करण्याचा स्वभाव असलेला ५ खेळाडु . खेळिन्नला - खेळला . ' ब्रह्माडमंडपीं गोंधळ । खेळिन्नला संतोषें । ' - मुआदि १ . ४१४९ . खेळी - स्त्री . १ खेळ ; माज . २ खेळण्याचा दिवस ; सुटीचा काल . ३ खेळण्याची पाळी ( बुद्धिबळें ). मोहर्यानें एक वेळीं केलेली हालचाल , किंवा गति . ४ खेळा पहा . - वि . खेळणारी ; मौजा मारणारी ; चवचाल स्त्री . ' माझी सासु मोठी खेळी । ' - भज ५५ . ०मेळी - स्त्री . १ दाट परिचय ; घसट ; सलगी . २ मौजा ; क्रीडा ; थट्टामस्करी ; रंगेल चेष्टा ; गंमत ; मौज . ०मेळीचा खेळ्यामेळ्या - वि . दाट परिचयाचा , सलगीचा . ०मेळां खेळीं मेळीं - क्रिवि . ( काव्य ) मौजेंत ; हास्यविनादांत किंवा खेळांत ; करमणुकीत ( काळ घालविणें ). ' आता जाऊं खेळेमेळी । गाई चारावया । ' - तुगा २३० . मौजेनें ; विनोदानें , परिहासबुद्धीनें , बोलणें , करणें ) खेळीमेळी आले घरी गोपीनाथ । गोपाळासंहित मातेपासी । ' खेळेंमेळे - क्रिवि . परस्परें थट्टा मस्करी करावयाजोग्या परस्परांच्या मित्रभावानें . ' एथें करौं या भोजनें । खेळेंमेळें । ' - दाव १९९ . ' आहार निद्रादि खेळेंमेळे । ' एभा १३ . ५६८ . खेळुगा - वि . खेळाडु .
|