Dictionaries | References

खैरा

   
Script: Devanagari
See also:  कैरा

खैरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kairā or khairā a Of a gray pupil--an eye; and attrib. Wall-eyed;--used of horses &c. The कैरा- डोळा is among the inauspicious marks of the horse.
   khairā m A blight attacking जोंधळा, बाजरी &c.
   Dark brown. 2 White sprinkled with red: also red sprinkled with white. 3 Of different colors--eyes: also having eyes of different colors. 4 Of mixed color, piebald. Note. Of the above variety, although, in part and in whole, firmly contended for, yet let the learner rest with the sense at the outset.

खैरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Dark-brown; of different colors.
  m  A blight attacking cereals.

खैरा

 वि.  १ कैरे डोळ्या ; मांजर्‍या ; घार्‍या डोळ्यांचा ( घोडा ); कैराडोळा असणें हे अशुभचिन्ह आहे . २ ज्यांचें बुबुळ घारें आहे असा ( डोळा ). ३ घार्‍या करड्या , रंगाचा . ' चितार भिंगारें खैरें । मोरें सेवरें आणि कैरें । ' - ह . १० . १९२ . ( हिं .)
  पु. शेणखळीच्या तळाशीं बसलेलें मातींत मिसळलेलें कुजलेलें शेण अगर शेणाचा भुगा . (?)
 वि.  घनसांवळा ; कपिश . २ करडा ; पांढर्‍यावर तांबडें किंवा तांबड्यावर पांढरें ठिपके असणारा . ' चितार भिंगारें खैरें । ...... अवघीं वासरें आपण जाहला । ' - ह १० . १९२ . ३ निरनिराळ्या रंगाचा ( डोळा ); किंवा निरनिराळ्या रंगाचे डोळे असलेला ( माणुस , पशु ) कैरा पहा . ४ मिश्र रंगाचा ; चित्रविचित्र ; मिश्र .
  पु. जोंधळा - बाजरीवर पडणारा एक रोग .
०कबुतर  न. लालभडक किंवा काळासर तांबट रंगाचें कबुतर .
०बांडा वि.  पांढर्‍यावर काळे किंवा काळ्यावर पांढरे ठिपके असलेला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP