|
अ.क्रि. १ गुंगुं करणें ; घुमणें ; गुणगुण करणें ( गांधील माशी , भुंगा , भोंवरा , जोरानें फेकलेला धोंडा , गोळा वगैरेनीं ). गुंगत गोळे येती छणाछण । - ऐपो २२३ . २ ( ल . ) हुं हुं हुं असें हळु गाणें ; मोठा शब्द न करतां तोंडांतल्या तोंडांत गाणें म्हणणें . [ घ्व . ] अ.क्रि. १ धुंद , जड , मूढ , सुस्त होणें . ( मूर्च्छा , निशा , झोंप यांनीं ) २ मागें लागणें ; भुलणें ; वेडावणें . त्या रांडेच्या पाठीमागें राजेश्री गुंगले . ३ हळूच जाणें ; निसटणें ; सटकणें . ४ तल्लीन , गर्क होणें ; निमग्न असणें . ५ गुंग होऊन डुलूं लागणें ; थक्क होणें . [ फा . गुंग , गुंगा = मुका ]
|