|
क्रि.वि. १ धान्य इ० एकदम पुष्कळ ओततांना होणार्या घस घस अशा आवाजानें . २ ( ल . ) एकदम ; एखाद्या कामाची तडाकाफडकी व चटपट यांचा निदर्शक शब्द . त्यानें घसकन भाताची वेळणी माझे पानांत ओतली . त्यानें घसदिशीं दहा रुपये काढून दिले . [ घ्व . ] स्त्री. १ व्यापारांत आलेली तूट ; तोटा ; नुकसान ; बूड ; खोट . ( क्रि० सोसणें ; बसणें ; लागणें ; येणें ). २ ( गळण्यानें , झिरपण्यानें , सुकल्यानें , घांसलें गेल्यानें ) पदार्थाच्या मूळच्या मापांत , वजनांत येणारी तूट , न्यूनता , झीज , घट . दोन मण गुळांत दहा शेर घस आली . घशीबद्दल लांकूड आकारांत धरूं नये . ३ सोनें पारखतांना कसावर उमटलेली सोन्याची रेघ ; सोन्याचा कस . [ सं . घृष ; प्रा . घस ; म . घासणें ] स्त्री. झुपका ; गुच्छ ; घड . ( प्र . ) घोंस पहा . स्त्री. १ ( कु . ) भांडें , कढई , किटली , मडकें इ० सतत चुलीवर ठेवल्यानें त्याच्या बुडाला जमणारा मशेरीचा थर ; खरप ; खरपी ; मस ; जळ . २ लोणी कढविल्यानंतर भांडयाच्या तळाला बसणारी बेरी . वि. ( राजा . ) एकदम उतरतें ; उभ्या उतरणीचें ( छप्पर इ० ).
|