Dictionaries | References

चितांक

   
Script: Devanagari
See also:  चिताक

चितांक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सोन्याचा पट्ट्यासारख्या आकाराचा एक दागिना   Ex. मराठ्यांच्या स्त्रिया चितांक घालत असत.
SYNONYM:
चिताक चितांग

चितांक

   पुस्त्री . हा अलंकार सोन्याचा असून मराठे लोकांतील स्त्रिया वापरतात . याचा आकार पट्टयासारखा असून तो गळयांत सरीसारखा घालतात . नाथांच्या वेळींहि तो गळयांत दागिना होता ; परंतु आठव्या शतकाच्या सुमारास तो कमरेचा दागिना होता असें दिसतें . चितिका कटिशृंखला - हारावली . तसेच ( त्याचा ) आकार पट्टयाप्रमाणें नसून साखळीसारखा होता . - मसाप २ . ३८ . फिटाला चिंतेचा अभिलाख । म्हणोनी न घाली चितांक । कृष्णपदींचा पदांक । तेचि पदक हृदयीचें । - एरुस्व ७ . ३७ . सरी चिताक भोंवरी । अलंकाराचिया परी । नामें झालीं दुरी । एक सोनें आटिता । - तुगा ३७७५ . [ सं . चित्र + अंकं - अंकन , रेखा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP