-
स्त्री. १ घसा ; घशाचा बाहेरील भाग ; घांटी ; कंठ , कंठमणि . गेलें घांटीं झालें माती . २ गळा ; कंठ ; आवाज . [ सं . घाट ] ( वाप्र . ) घांटीं फुटणें - १ ( मुलाच्या ) आवाजांतील कोमलता जाऊन तो मोठा , प्रौढ होणें ; हें ( मुलगा ) वयांत येण्याचें लक्षण आहे . घांटीं फुटला = बदसूर झाला . २ ( गाणार्याचा ) आवाज घोगरा होणें ; स्वरभेद होणें ; स्वर बिघडणें ; आवाज चिरकणें , बसणें ; घांटीं शेंदूर ओतणें - ( पेय , खाद्यपदार्थांत मिसळून ) शेंदूर गिळावयाला , खायला लावणें ; प्रतिपक्षीय गवयाचा कंठ बिघडविण्याकरितां ही युक्ति करतात . सामाशब्द -
-
. This is often done to a vocalist to destroy his voice.
-
स्त्री. १ घंटा ; जनावराच्या गळयांतील घंटा . वाजती शंख घांटा । मी जाते वैकुंठा । - मसाप २ . १ . २२ . २ ( उप . ) गुप्त गोष्ट सर्वांना सांगत सुटणारा , चोंबडा , चहाडखोर माणूस , बोंबल्यागणेश ; जिभेचा , कानाचा हलका ; लुतरा ; गजघंटा . [ सं . घंटा ] ( वाप्र . ) घांटेखालीं उभें राहणें - ( शपथेचा एक प्रकार ) शपथ घेणें . सामाशब्द -
-
f The throat, esp. the upper part of larynx.
Site Search
Input language: