Dictionaries | References

जणें

   
Script: Devanagari
See also:  जण , जणी

जणें

  पु. न . ( अव . ) माणूस ; व्यक्ति ; असामी ; लोक . या शब्दाच्या मागें संख्यावाचक शब्द लावतात . जसें दोन - तीन - चार - जण . ऐसे तिघे जण प्रबुध्द थोर जाले । - पंच १ . २ . दोघे - तिघे - चौघे जण किंवा व्यक्ति . हा शब्द फक्त मनुष्यांनाच लावितात . जन पहा . [ सं . जन ] ( वाप्र . ) जण हाराचें , जण चोराचें - कांहीं लोक चोराच्या बाजूला , कांहीं लोक धन्याच्या बाजूला असतात अशांना उद्देशून . जणाचे हाती दोन धोंडे - कोणत्याहि तर्‍हेनें वागलें तरी लोक खूष राहात नाहींत याअर्थी . जणांत मिसळून राहाणें , जणांत मिसळून असणें - लोकांत मिळून मिसळून राहणें - असणें . जणकथा , चाल , जाहीर , मर्यादा , लज्जा , वाढ - जन मध्यें पहा . [ सं . जन . पं . जणा ; गु . जण ; सिं . जणो ; फ्रेंजी जेनो ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP