-
पु. १ देश अर्थ १ पहा . प्रदेश , प्रांत . शिरवळ सुपे देस । - ऐपो ९ . २ . तुच्छतादर्शक शिवी . - शास्त्रीको . ३ एक राग . ह्या रागांत षड्ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . आरोहांत गांधार व धैवत स्वर वर्ज्य . जाति औडुव - संपूर्ण . वादी ऋषभ संवादी पंचम . गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर . [ सं . देश ]
-
०क पु. पिढीजात वतनदार ; सरकारी अधिकारी ; प्रायः देशमूख .
-
०कत की नस्त्री . देसकाचे काम , अधिकारी ; देसाईपणाचा हक्क . कागल प्रांताची पूर्वी देसकत होती ... - मराचिथोरा ४१ . कू ( महानु . ) समूह . आईकैल श्रोतयाचा देसकू । - भाए १६ .
-
०गौड पु. एक राग . ह्यांत षड्ज , कोमल ऋषभ , पंचम , धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . गांधार व मध्यम स्वर वर्ज्य . जाति औडुव - औडुव . वादी धैवत , संवादी ऋषभ . गानसमय प्राःकाळ .
Site Search
Input language: