Dictionaries | References

झोंमणें

   
Script: Devanagari
See also:  झोंबणें

झोंमणें

 स.क्रि.  ( हें क्रियापद कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणें चालतें ) १ तीव्र वेदना होणें ; मर्मभेद होणें . ( ल . ) बोचणें ; टोंचणें ; चावणें ; चरचरणें ; झणाणणें ; चुणचुणणें ; डसणें ( जाळ , उपरोधिक शब्द किंवा भाषण , निंदा ). दाही मुखीं झोंबती ज्वाळा । २ डसणें ( साप ). कीं झोंबला करीं साप । - मोकर्ण ६ . ५६ . नांगीनें टोंचून तीव्र वेदना करणें ( विंचू इ० नीं ). ३ जोरानें व बलात्कारानें स्त्रीस आलिंगणें , दाबून धरणें ; पकडणें ; अंगलट येणें ; मिठी मारणें . ऐसे वदोनि कंठीं झोंबें दु : शासन स्वभावाच्या - मोवन ७ . ७० . जोरानें घसटणें . ४ भांडणें ; मस्ती करणें ; युध्द करणें ; तुटून पडणें . इकडे निशाणाकडे जनकोजी शिंदे झोंबतच होते . - भाब ६३ . ५ ( ल . ) ओढा असणें . कृष्णाकडे झोंबति मायबापें । - सारुह ७ . ९२ . ६ ( ल . ) आकलन करणें ; समजून घेणें . बोलाआदि झोंबिजे । प्रमेयासि । - ज्ञा १ . ५८ . ७ ( ल . ) झटून काम करणें . नरनारी झोंबती साहित्य करित । - दावि १७२ . ८ लगटणें ; गुंतणें ; बिलगणें ; पकडणें . उत्तरिया झोंबे तान्हें तें दूर करून । - विक ११५ . [ का . जोंपिसु = थरारणें , धक्का ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP