Dictionaries | References

तावडणे

   
Script: Devanagari

तावडणे

 अ.क्रि.  ( सक्तीने अथवा आपल्या खुषीने एखाद्या उद्योगांत , कामांत ) एकसारखे खपणे ; राबणे ; व्यापृत असणे . ऐन दोन प्रहरच्या उन्हांत तावडला म्हणून ताप आला . हा मुलगा प्रहरभर पाण्यांत तावडतो . - उक्रि तावडणे . १ ( एखाद्यास जबरदस्तीने ) कष्टाच्या कामांत गुंतवून ठेवणे ; राबवून घेणे ; कामास जुंपणे ; वेठीस धरणे ; तांगडणे अर्थ ३ पहा . २ ( एखाद्यास त्रासदायक अशा प्रकारे ) खोळंबा करणे ; खोळंबून धरणे ; डांबून ठेवणे . तांगडणे अर्थ ४ पहा . ३ ( घोडा इ० जनावर ) दामटणे ; धसाफशीने वापरणे ; भरधांव पळविणे ; तांगडणे अर्थ ६ पहा . ४ राबविणे ; कष्ट करावयास लावणे ( उन्हांत , वार्‍यांत , थंडीत , चिखलांत पावसांत ) दामटणे . ताबडणे . [ तावडी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP