|
स्त्री. १ ( एखादे कागदपत्र इ० ) तीन वेळा तपासून शुद्ध केले आहे हे दर्शविण्याकरितां त्या अर्थाची त्यावर मारलेली टीप . २ त्रिवार शुद्ध झालेली स्थिति . मी ऋणत्रयापासून त्रिशुद्धि । मुक्त झालो भगवंता । ३ तीन वेळां प्रतिज्ञापूर्वक शपथपूर्वक उच्चारुन , सांगून झालेली ( एखादे वचन ; गोष्ट इ० कांची ) शुद्धता ; सत्यता ; निश्चितता ; सांगता . पिता निंदी त्रिशुद्धि । पिशाच होय दुरात्मा । ४ तीन वेळाम स्नान करुन , धुवून , घासून , तापवून , कोणताहि एखादा पदार्थ शुद्ध करण्याचा प्रकार करुन झालेली ( व्यक्ति , वस्तु इ० कांची ) शुद्धता . ५ तीन वेळां , तीन ठिकाणी स्नाने घालून झालेली विटळशीची शुद्धता . ६ कायिक , वाचिक व मानसिक शुद्धता , शुद्धीकरण . - वि . तीन वेळां तपासून , शुद्ध करुन बरोबर , खरे ठरविलेले . हा शब्द सरकारी कागदपत्र , अर्ज इ०कांवर - तो पूर्णपणे मुक्रर करण्यांत आला आहे हे दर्शविण्याकरितां - लिहितात . - क्रिवि . खरोखर ; निश्चयेकरुन ; त्रिवार खरे . म्हणूनि आखरामाजि सांपडे । की कानावरी जोडे । हे तैसे नव्हे फुडे । त्रिशुद्धी गा । - ज्ञा ६ . ३१६ . तरी मी प्राण त्याजिन आधी । हे त्रिशुद्धी जाणपां । - भुवन १ . ११७ . [ सं . त्रि + शुद्धि ]
|