Dictionaries | References

थापटणे

   
Script: Devanagari

थापटणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : थापणे

थापटणे

  न. १ कुंभाराचे मडकी घडावयाचे हत्यार . २ वस्तरा लावण्याचा कातड्याचा तुकडा . ३ गवंड्याचे गिलावा इ० ठोकावयाचे हत्यार .
 स.क्रि.  १ थापट , चापट मारणे . २ ( ल . ) गोडी गुलाबीने वळविणे ; शांत करणे ; कुरवाळणे . ३ ( थापटून ) अंगावर सामान घालून तयार करणे ( घोडा , बैल ). ४ दंड ठोकणे ( अंगी पराक्रम , बळ आहे असे दाखविण्यासाठी ). चढले रथी भुंजाते भ्राते भीमादि सर्व थापटुनि । - मोभीष्म १ . ११३ . ५ जागच्या जागी दाबणे . मन राखे हाती घेउनियां काठी । इंद्रिये थापटी फाको नेदी । - तुगा २१२३ . [ ध्व . थप्प ; सं . हस्तस्फटनं - हत्थ्थापटणं - अत्थ्थापटणं - थापटणे - भाअ १८३५ . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP