Dictionaries | References

दंत्त

   
Script: Devanagari

दंत्त

 वि.  दिलेलें दिलें . दत्त म्हणुन हजर - एखादी इच्छा करावी किंवा सहज बोलावयास जावें तो त्याप्रमाणें घडुन येणें . याबद्दल एक गोष्ट सांगतात . एक मनुष्य होता तो संसारास कंटाळुन अरण्यांत गेला . तेथें एका झाडाखालीं बसून तो मनाशीं म्हणुं लागला कीं येथें आपणास सुग्रास भोजन मिळेल तर काय बहार होईल . त्याबरोबर त्यास तेथें सुग्रास भोजन मिळालें . कारण तें झाड कल्पवृक्षाचें होतें किंवा त्या झाडावर देवतेची वस्ती होती . याप्रमाणें मनांत आणावें ती वस्तु त्याला मिळत गेली . शेवटी त्यास येथें कोणी भूत तर नाहीं व तें आपणास खाणार तर नाहीं असें मनांत वाटूं लागलें म्हणुन तो म्हणाला मला कोणी खाणार तर नाहीं ? तों त्याप्रमाणें दत्त म्हणुन एक पिशाच्च येऊन त्यांनें त्यास खाऊन टाकलें ( सं . दा = देणें - दत्त )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP