-
न. १ ( गो . कु . ) देवळांतील देवतेच्या चिन्हाचा खांब , गुढी . २ अंगांत देव संचारणार्याने हातांत घ्यावयाची काठी ; धार्मिक समारंभातील एक उपकरण ; हे मुसळासारखे असून त्यावर देवांची चित्रे काढलेली असतात . काही सणांत याच्या शेंड्यास बरीच लुगडी नेसवून तो नाचवितात . नाचविल्यावर अवसर येतो . तरंग घेण्याचा मान ठराविक कुटुंबाकडे असतो . आम्ही गावकर लोकांनी नारळ फोडल्याविना देवीपुढे तरंग उभं राहतं तर पहा ? - सह्याद्री ९२ .
-
पु. १ पाण्याची लाट , लहर , खळबळ ऊर्मि . पै आटोनि गेलिया सागरु । मग तरंगु ना नीरु । - ज्ञा १५ . ५०६ . उदकावरील तरंग । तरंग उदकाचे अंग । - तुगा ३७६९ . २ ( ल . ) अनियंत्रितपणाने मनांत एकामागून एक उद्भवणार्या विचारांपैकी प्रत्येक ; क्षणिक विचार ; नवी कल्पना ; लहर . ३ दृष्टि अस्पष्ट करणारा , डोळ्यावर येणारा साका , पटल . ५ जलतरंग पहा . ६ . बुडबुडा ; फुगा . [ सं . ]
-
काष्ठतरंग , घंटातरंग घुंगरुतरंग , जलतरंग , नसतरंग , बासतरंग , बुजबुलतरंग , लोहतरंग , स्तंभतरंग इ . वाघें . निरनिराळ्या पदार्थावर अगर वस्तुंवर आघात वगैरे करुन स्वरसप्तक बसवून निरनिराळे राग वाजविणे .
-
ना. नवी कल्पना , लहर , क्षणिक विचार ;
Site Search
Input language: