-
पु. १ संबंध ; संयोग ; संगति . कीं लवणेंचि जळ विरे । संसर्गें काळकूट मरे । - ज्ञा २ . १५ . २ संघटन ; परिचय ; दळणवळण ; व्यवहार . ३ स्पर्श ; सांनिध्य ; निकटपणा . [ सं . सम् + सृज् ] संसर्गाभाव - पु . ( तर्क . ) अभाव ; विनाश . याचे तीन प्रकार ; आहेत - प्राक् , नैमित्तिक व अंत्य ; जन्म अथवा उत्पत्तीचा अभाव ; नाश किंवा लय . संसर्गित - धावि . संबध्द ; युक्त . संसर्गी - वि . १ संबध्द ; निगडित ; निकटचा ; जवळचा . २ परिचित ; संगत ; ओळखीचा वगैरे .
-
ना. संगती , संपर्क , संबंध , संयोग , स्पर्श ;
-
ना. निकटपणा , सान्निध्य .
-
saṃsarga m S Contact, contiguity, junction, proximity, concomitancy; the going or the being with or together. 2 Intercourse, intercommunication, maintenance of dealing or acquaintance with.
Site Search
Input language: