-
तरवारींचें प्रकार . लहान . -- १ क्रियाखड्ग . २ मरकखडग . ३ मारखडग . ४ मार्गस्थखड्ग . ५ चित्रतालितखड्ग . मध्यम - १ सुखसंचारखड्ग . २ सुखसंनाह्यखडग . ३ मध्यम . ४ मधोत्तम . उत्तम . १ दुर्धर्ष . २ विजय . ३ सुनन्द . ४ नन्दन . ५ श्रेषाठ . - युक्तिकल्पतरु . प्रश - ७४ . इतर प्रकार - अग्रपृथु . मूल पृथु . संक्षित्प्त मध्य , समकाय , पीडित पत्र , एकधारा , द्विधारा . तरवाईचें हात अथवा पवित्रे , असोचालन - १ भ्रांत . २ उरुदांत . ३ आविद्ध . ४ आप्लुत ; ५ सुत . ६ संताप . ७ विप्लुत . ८ समुदीर्ण . ९ श्येनपात . १० आकुल . ११ अध्युत . १२ सव्य . १३ अवधूत . १४ वाम . १५ अलखित . १६ विस्फोट . १७ कराल . १८ इंद्र . १९ महास्कह . २० विक्राळ . २१ निपान . २२ विमिष्क . २३ भयानक २४ समग्रकमल . २५ अर्थ कमल . २६ तृतीय कमल . २७ पादकमल . २८ पादार्धकमल . २९ प्रत्यालीढ . ३० आलीढ . ३१ वराह . ३२ ललित .
-
स्त्री. युद्धोपयोगी एक शस्त्र ; समशेर ; खड्ग ; मोठी कट्यार . हे शस्त्र धातूचे केलेले असून दोन किंवा अडीच फूट लांब असते . याच्या एका अगर दोन्ही बाजूंस धार असते . तरवारीच्या अलेमान , जवाहीर , तेगा ; धोप , निमचा , पट्टा , सडक , सैफ इ० जाती आहेत . मर्दाने हो राज्य राखिले मनसुबीची तरवार । [ सं . तरवारिः ] ( वाप्र . )
-
लोंबती तरवार
-
डोक्यावर नेहमी तरवार लोंबत असली म्हणजे तिच्या भयाने मनुष्य सावधगिरीने राहतो
Site Search
Input language: