Dictionaries | References

नजर

   
Script: Devanagari

नजर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : दृष्टि, दृष्टिकोण, नज़र, उपहार, निगरानी, पहचान, दृष्टि, ध्यान, नज़र, नज़र

नजर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : वायट नदर

नजर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   beyond the reach of vision. नजरेनें पाषाण उलणें Expressive of keenness and severity in the eye of. न0 फाकणें g. of s. To get a wild and roving vision. 2 To become ambitious or avaricious. न0 मरणें g. of s. To get familiarized with the sight of. For other idioms and phrases see under दृष्टि.
   A present to a superior: also presents made and received among people of rank when they visit. v कर. Hence, by meton., An interview.

नजर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Sight, vision. Regard. A present.
नजर देणें   To have the eye upon; to aim.
नजर न पुरणें   To be beyond the reach of vision.
नजर फांकणें   To become ambitious or avaricious.
नजर मरणें   To get familiarized with the sight of.

नजर

 ना.  द्दष्टी , पाहणे ;
 ना.  उद्देश , धोरण ;
 ना.  डोळा ठेवणे , देखरेख , पहारा , लक्ष .

नजर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्यावर ठेवलेले ध्यान   Ex. अमेरिकाच्या नजरा जगातील प्रत्येक देशावर आहे.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdنظر
 noun  डोळ्यांचा दृष्टि-क्षेत्र किंवा डोळ्यांनी जेथपर्यंत पाहता येईल असे   Ex. जोपर्यंत तो माझ्या नजरेपासून दूर गेला नाही तोपर्यंत मी त्याला पाहत होतो.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दृष्टि
Wordnet:
benদৃষ্টিসীমা
gujદૃષ્ટિ
hinदृष्टि
kanದೃಷ್ಟಿ
kokनदर
malകണ്‍ വെട്ടം
oriଦୃଷ୍ଟି
panਨਜਰ
sanविलोचनपथः
telదుష్టి
urdبصارت , نگاہ , نظر , آنکھ
   See : दृष्टी, दृष्ट, दृष्टी

नजर

  स्त्री. १ दृष्टि ; नदर . माझ्या नजरेस जो पडेल त्याची मी आहुती घेई . - विवि ८ . ८५५ . २ धोरण ; उद्देश ; पहाणे . अवरंगजेबास ठायी ठेवावे ही नजर पावली नसली तर .... अवहेलना न करितां गुण ते बोलावे . - मराआ १५ . ४ इच्छा ; हांव . नजर भारी ! होनाचे नाणे ! लकाराशिवाय बोलीच नाही असा प्रकार . - ख ७ . ३२५९ . ५ वाईट व बाधक दृष्टि ; दृष्ट . लोभी , कामी दृष्टि . त्यांची नजर आपली तुझ्यावर . - मोर ३५ . ६ . ( ल . ) तर्क ; अवलोकन करण्याची शक्ति . त्यांत माझी नजर बराबर चालली नाही . - विवि ८ . १ . १८ . ७ निगा ; काळजी . [ अर . नझर ; हिं . गु . नजर ]
०करणे   निगा ठेवणे . संग्रह करावा . याची बरी नजर करावी . - मराआ १२ .
०टाकणे   ( एखाद्या वस्तूकडे ) ओझरते पहाणे . या अर्थावरुन नजर टाका . - भक्त मयूर केकावली २ .
०देणे   ( एखादी गोष्ट ) विचारांत घेणे .
०धरणे   इच्छा करणे . कदाचित त्याचे वंशजांनी त्यामागे हरामखोराची नजर धरली तर त्यास त्याच वृत्तीचे बल होणार . - मराआ २४ .
०न   - ( एखादी गोष्ट ) दृष्टीच्या , शक्तिच्याबाहेर कक्षेबाहेर ( विस्तृत , गूढ , मोठी , बहुसंख्यांक ) असणे .
पुरणे   - ( एखादी गोष्ट ) दृष्टीच्या , शक्तिच्याबाहेर कक्षेबाहेर ( विस्तृत , गूढ , मोठी , बहुसंख्यांक ) असणे .
०पडणे   ( एखाद्याची ) दृष्ट लागणे ; बाधणे . - विचावि २३० .
०फांकणे   १ दृष्टि विस्तृत होणे . २ ( एखाद्याची ) महत्त्वाकांक्षा , लोभ इ० वाढणे .
०मरणे   ( तीच तीच गोष्ट पुनःपुनः केल्याने तिच्या बद्दलचे ) भय , आदर , किळस इ० नष्ट होणे ; ( एखादी गोष्ट ) दृष्टीला पूर्ण परिचित होणे . या संबंधाने बर्‍याच लोकांची अजून नजर मेली नाही . - आगर ३ . ४३ . नजरेत नजरांत आणणे ताब्यांत आणणे ; डोळ्यांसमोर ठेवणे ; लक्ष्यांत घेणे . नजरांत आणिला कारभार । - दावि ३१ . नजरेत धरणे पर्वा करणे . हम्बीरराव याणी दिलेलखान नजरेत धरला नाही . - सभासद ६४ . नजरेस पडणे दिसणे . नजरेस येणे १ पसंत पडणे . २ माहित होणे ; दृष्टीस पडणे ; लक्षात घेणे . नजरांत आणिला कारभार । - दावि ३१ . नजरेचा खेळ पु . १ केवळ दृष्टिक्षेपाने , एकदां नजर टाकण्याने होणारे काम , गोष्ट ; किरकोळ सुलभ काम . २ मुख्यतः दृष्टीनेच साध्य असलेले काम , विषय . उदा० चित्रकला , तिरंदाजी , लेखन . ३ दृष्टीचे अद्भुत , विलक्षण , आश्चर्यकारक कृत्य , काम . जसेः - अतिशय सूक्ष्म अक्षरे , चित्रे काढणे ; बारीक शिवणे ; घड्याळाची सूक्ष्म यंत्रे बसविणे इ० . ४ चांगली बळकट दृष्टि , पराकाष्ठेची तारतम्यदृष्टि लागणारी गोष्ट . दृष्टीचा खेळ व नजरेचा खेळ हे शब्द एकमेकांबद्दल पर्याय म्हणून योजतात व तसे करणे इष्ट आहे . कांही मात्र वर दिलेल्या अर्थाप्रमाणे उपयोगांत आणितात . दृष्टीचा खेळ पहा . नजरेची बाधा दृष्ट . आज रामूला नजरेची बाधा झाली . नजरचे पाप , नजरेचे पाप न . प्रत्यक्ष ( एखादी वाईट गोष्ट ) पहाण्याने होणारे पाप ; पाहण्याचे पाप . ( एखादी विशिष्ट गोष्ट नजरेआड घडल्यास खपते पण समोर घडल्यास खपत नसते अशा वेळी उपयोग ). नजरेने क्रिवि . समक्ष ; प्रत्यक्ष . त्यासही येथील विचार नजरेने दाखवून जो विचार सांगणे ... - पेद ३ . १८३ . नजरेने पाषाण उलणे फार वाईट नजर असणे . दृष्टि या शब्दांतील इतर वाक्प्रचार पहा . सामाशब्द -
०अंदाजा  पु. नजरेने पाहणी करुन ( पीक इ० कांचा ) केलेला अंदाज ; ( सामा . ) डोळ्यांनी पाहून एखाद्या वस्तूचे मान , परिमाण ठरविणे ; अशा रीतीने ठरविलेला अंदाज , अटकळ . नजर - अंदाजा - पाहणी - मोजणी - मोजदाद - अजमास - पडीत - वहीत - पीक - बार - किंमत - वजन . [ नजर + अंदाज ]
०एनायत  स्त्री. कृपादृष्टि . नजर एनायत फर्माऊन . - रा १६ . १३८ .
०कैद  स्त्री. साधी अटक . [ नजर + कैद ]
०गहाण   गाहण गहाण ठेवलेली मिळकत सावकाराच्या ताब्यात न राहता ऋणकोजवळ न राहता ऋणकोजवळच राहते असला गहाणाचाच एक प्रकार ; ह्या प्रकारांत ऋणकोने मी जातीने कर्ज फेडीन न फेडल्यास सावकाराने माझी विवक्षित मिळकत विकून तिच्या किंमतीतून आपले कर्ज सव्याज फेडून घ्यावे असे लिहून द्यावे लागते . - घका ३० . याच्या उलट अमलगहाण , ताबेगहाण . [ नजर + गहाण ]
०गुजार  स्त्री. परीक्षा ; पारख . आपण राजियांनी नजरगुजर करुन एकेक माणूस पाहून ठेवावे . - सभासद २१ . - वि . डोळ्याखालून घातलेले ; गेलेले ; पारखलेले ; दृष्टिगोचर झालेले . तसेच तटसरनोबत ... जे ठेवणे ते बरे मर्दान कबिलेदार विश्वासु असे पाहून नजरगुजार करुन ठेवीत जावे . - मराआ २८ . [ नजर + फा . गुझार - गुझास्तानचे अज्ञार्थी रुप ]
०गुजारत   गुजारा - स्त्रीपु . नजरानजर ; दृष्टादृष्ट ; भेट . त्याची व आमची नजरगुजारत होईल तेव्हां काय बोलणे ते बोलूं . [ नजर + गुजारत , गुजारा ]
०चूक  स्त्री. दुर्लक्षामुळे , नकळत , घडलेली झालेली चूक , दोष ; दृष्टिदोष . [ नजर + चूक ]
०चोर  पु. धूर्तपणाने , कावेबाजपणाने नजर चुकविणारा ; दृष्टीस पडण्याचे टाळणारा . [ नजर + चोर ]
०दौलत  स्त्री. लक्ष्मीची कृपादृष्टि . - राव्यको ८ . ६७ . [ नजर + दौलत ]
०पापी वि.  वाईट , पापी , दुष्ट नजरेचा .
०पारख  स्त्री. १ पाहतांक्षणीच , बाह्यस्वरुपावरुन ( एखाद्या गोष्टीची , व्यक्तीची ) केलेली परीक्षा , अनुमान . २ पाहतांक्षणी , बाह्यस्वरुपावरुन अनुमान , तर्क करण्याची शक्ति , चातुर्य . [ नजर + पारख = परीक्षा ]
०पाहणी  स्त्री. केवळ नजरेने पीक , जमीन , धान्याची रास इ० कांचा केलेला अजमास , अटकळ . [ नजर + पाहणी ]
०बंद  पु. १ नजरबंदी करणारा ; गारुडी . २ ( कों . ) नजरबंदी पहा . क्रिवि . साध्य अटकेत ; ज्याच्या हालचालीवर सक्त नजर आहे अशा स्थितीत . बादशहाने नजरबंद केले . - मराचिथोशा ३ . [ फा . नझरबंद ]
०बंदी  पु. १ दृष्टीला भूरळ पाडणे ; जादुगिरी ; हातचलाखी ही जादूची नजरबंदी कुणि आणि कुठे कशी केली ? - वाग्वै
०बाग  पु. घर , राजवाडा इ० कांसमोर शोभेकरिता केलेला सहज दृष्टीस पडावयाजोगा बाग . पांच कैदी नव्या वाड्यांतील नजरबागेत आणून त्यास समक्ष रुळ ढोराप्रमाणे त्याचेकडून ओढवले . - विक्षिप्त २ . १०१ . २ गच्चीवर , खिडकीपुढे फुलझाडांच्या कुंड्या वगैरे ठेवून केलेली बागेसारखी टुमदार रचना .
०बाज वि.  १ सूक्ष्म नजरेने परीक्षा , निरीक्षण करण्यांत कुशल . २ हेर ; टेहळणी करणारा . - ऐटी १ . ४४ . शहारांत नजरबाज लोक ठेवून ... - मरिउनि २ . २०० . ३ डोळे मोडणारा , मारणारा ; नेत्रसंकेत करणारा . [ नझरबाझ ]
०बुलंद  स्त्री. कृपादृष्टि . गरिबांवर नजरबुलंद झाल्याने आपलेच गांव आहे . - पदमव १७ .
०भूल  स्त्री. पाहण्यांत झालेली चूक ; डोळ्यांना पडलेली भुरळ ; नजरचूक . [ नजर + भूल = चूक , मोह ]
०मासला  पु. नुसत्या नजरपहाणीने मिळालेला मासला , नमुना नजरअंदाजा या शब्दाबद्दल योजितात .
०मुबारक   मुबारकी - स्त्री . शुभदृष्टि ; कृपादृष्टि . [ नजर + अर . मुबारक = शुभ , मंगल ]
०मोजणी  स्त्री. मोजण्याच्या कोणत्याहि साधनाचा उपयोग न करतां केवळ नजरेने केलेली मोजणी . नजर मोजणी करावयाचा शिरस्ता आहे . - मसाप २ . २ . १४१ . [ नजर + मोजणी ]
०मोजबा  पु. चौकशी ; पाहणी . - वाडसमा २ . २ . ३५ .
०हुजूर   नजरेहुजूर - क्रिवि . प्रत्यक्ष ( राजाच्या , हुजुराच्या ) समक्ष , दृष्टीखाली ; समोर . [ नजर + हुजूर ] नजरानजर - स्त्री . परस्परांनी एकमेकांस पाहणे ; दृष्टादृष्ट ; भेट . [ नजर . द्वि . ]

नजर

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : दृष्टिकोण, दृष्टि

Related Words

नजर   नजर चुकविणे   रागीट नजर   चोरटी नजर   नजर धरणें   नजर चुकवणे   नजर पोचणें   नजर फिरणें   नजर वाहणे   नजर फाटणें   नजर लागून राहाणें   नाकापर्यंत पदर आणि वेशीपर्यंत नजर   छपन्न वखारी भारी कुंची, हातीं न दिसे पण नजर उंची   करडी नजर   वांकडी नजर   तिरछी नजर   धावती नजर   नजर अंदाज   नजर अंदाजी   नजर अंदाज़ी   नजर अन्दाज   नजर अन्दाजी   नजर आना   नजर गराइ   नजर चुराना   नजर टाकणें   नजर ठेवणे   नजर डालना   नजर देणें   नजर दौड़ाना   नजर पडणे   नजर पड़ना   नजर फेरना   नजर बचाना   नजर बसणें   नजर मरणें   नजर रखना   नजर राख्‍नु   नदर   खालीवर नजर करणें   खालीवर नजर ठेवणें   खालीवर नजर पहाणें   सरसरी नजर डालना   दिवसावर नजर देणें   दुसर्‍याच्या पागोटयावर नजर ठेवणें   चांभाराची नजर जोड्यावर   चांभाराची नजर पायांकडे   डोक्‍यावर पदर, दिल्‍लीवर नजर   नजर-ए-इनायत   नजर का टीका   नजर फेर लेना   विलोचनपथः   దుష్టి   দৃষ্টিসীমা   દૃષ્ટિ   കണ്‍ വെട്ടം   मालकाची नजर व नोकराची कदर   मुद्रा बावळयाची आणखी नजर कावळयाची   sight   ಕಣ್ಣಿಗೆ ಬೀಳದಂತೆ ಹೋಗಿಬಿಡು   evil-eye   जो नजर न आवे, सो भुलजावे   भिक मागे भराडी, दाण्यावर नजर करडी   नजर दिली फायद्यावर, मुर्दा आला खांद्यावर   दृष्टि   कतराना   क्रुद्ध दृष्टि   तेवर   रागिश्ट नदर   भ्रूकुटिः   ژَکھ   கோபப்பார்வை   நழுவு   తప్పించుకుతిరుగు   કતરાવું   মুখ লুকানো   কোপদৃষ্টি   ক্রুদ্ধ দৃষ্টি   ਕਤਰਾਉਣਾ   ਤੇਵਰ   କୁପିତ ଚାହାଣି   તેવર   ഒളിച്ചുനടക്കുക   ക്രുദ്ധമായനോട്ടം   viewpoint   visual modality   visual sense   watch over   standpoint   keep an eye on   point of view   eyeshot   unattended   vision   observe   नायहाबनाय   చూపు   দৃষ্টি   ਨਜਰ   ଦୃଷ୍ଟି   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP