-
ताल कुल, पामेसी
-
ताल कुल, पामेसी
-
ताड, माड, पोफळी, शिंदी, खजूर, वेत इत्यादी उपयुक्त व परिचित एकदलिकित वनस्पतींचे मोठे कुल, याचा अंतर्भाव (पामेलीझमध्ये) ताल गणात करतात. प्रमुख लक्षणे- बहुधा झुडपे व वृक्ष, क्वचित औषधी, खोडाला फांद्या क्वचित असतात. संयुक्त पाने हाताच्या पंजाप्रमाणे किंवा पिसासारखी विभागलेली व एकाआड एक असून पानाचा तळ खोडास वेढून (आवरक) राहतो. फुलोरा जाडजूड कणिशासारखा व शाखित असून त्यावर एकलिंगी किंवा द्विलिंगी फुले एका किंवा विभक्त झाडावर आढळतात. फुले लहान, परिदले तीनच्या दोन वर्तुळात, तसेच केसरदलेही. तीन ऊर्ध्वस्थ किंजदलांचा संयुक्त किंजपुट, क्वचित विभक्त किंजदले, एक किंवा अनेक बीजके, फळ मृदु किंवा अश्मगर्भी व त्यावर सहवर्धिष्णु परिदले असतात. बिया सपुष्क
-
palmae
Site Search
Input language: