Dictionaries | References

नेण

   
Script: Devanagari

नेण

  न. अज्ञान ; नेणीव पहा . - वि . अज्ञानी ; अजाण ( मुल ). - एभा २४ . ६ . जाणोनि कासया होसी नेण । - मुसभा १३ . १७ . [ सं . न + ज्ञान ]
०पण  न. १ जाणतेपण इ० नेणपण सोडूं नये । - दा १४ . १ . ४५ . २ अज्ञान ; न जाणणे . नेणणे न . ( ल . काव्य ) अज्ञान , न जाणणे . जे नेणणे माझे प्रकाशूनि । अन्यायत्वे माते देऊनि । सर्वही सर्वी भजौनि । बुझावीतसे जे । - ज्ञा १८ . १११४ . - अक्रि . न जाणणे ; न समजणे ; न कळणे . नेणतेपण न . १ अज्ञान . २ बाळपणांतील अज्ञानावस्था . [ नेणणे + पण ] नेणता नेण वि . १ अजाण ; समज नसणारा ; अननुभवी ; मूर्ख . नेणत भक्त मी तूझा । बुद्धि दे रघुनायका । - राम . २ जाणता . [ सं . न + ज्ञान ] नेणो न . जाणो . कदा नेणो वोढी शरधिंतुनि काढी । शर कदा । - र ३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP