|
पंचदेवता पहा. विष्णु, शिव, सूर्य गणपति, देवी. या पांच मुख्य देवता पंचायतनामध्यें असतात व त्यांत जो ज्या विशिष्ट देवतेचा उपासक असेल तो तीस मध्यें स्थापन करुन बाकीच्या चार चारी बाजूस ठेवतो. उदा. विष्णुपंचायतन, शिवपंचायतन, सूर्यपंचायतन वगैरे. यांच्या प्रदक्षिणांचे प्रमाण-गणपतिअ तीन, शिव ॥’, हरि चार, सूर्य सात, शक्तिअ एक.
|