Dictionaries | References

पैगंबरवासी

   
Script: Devanagari

पैगंबरवासी

   परलोकवासी ; मृत हा शब्द महंमदानुयायी मृत झाला असतां उपयोगांत आणतात . परंतु तो चुकीचा आहे . हा वैकुंठावासी , कैलासवासी या शब्दांशी सादृश्य भावनेनें बनविण्यांस आलेला आहे . परंतु वैकुंठ व कैलास हे जसे लोक म्हणजे प्रदेश आहेत तशी कल्पना पैगंबर या शब्दानें व्यक्त होत नाहीं ; कारण पैंगबर म्हणजे प्रेषित . तेव्हां पैगंबर लोकवासी असें वाटल्यास म्हणावें . तसेच ख्रिस्ती व महमंदी लोकांच्य कल्पनेप्रमाणे सर्व मृत व्यक्ति निर्णय दिनाच्या दिवशी पुन्हां जिवंत होणार आहेत व त्यांच्या न्याय झाल्यानंतर त्यास स्वर्ग किंवा नरक प्राप्त होणार आहे . तेव्हां न्यायादिनाच्या पूर्वे त्याच्या लोक निश्चित होत नाहीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP