स्त्री. - खांद्यापासून कमरेपर्यंतचा भाग . बाजू .
-
काख .
- अंगरखा , बंडी इ० च्या बाहीला लावलेली कळी किंवा तिकोनी अगर चौकोनी पट्टी .
- लंगड्या माणसाची कुबडी .
न. बाजू .
( मल्लविद्या ) जोडीदाराच्या उजव्या बगलेंतील खड्ड्यांत जंबियानें मारणें . [ फा . बघल ] ( वाप्र . )
०देणें एका बाजूला होणें , सरणें .
०मारणें सैन्याची एक बाजू पराभूत करणें , कापणें .
एके बाजूस होणें , वाट देणें . आम्हांस गिलच्यानें वाट देऊन एकीकडे बगल मारुन जाहला . - भाब ११३ .
०दाखविणें बगल ला वर करणें - आपल्या जवळ कांहीं नाहीं हे सिद्ध करण्यासाठीं बाहू वर करुन दाखविणें ; दिवाळें वाजल्याचें प्रसिद्ध करणें .
बगलेंत असणें -( एखाद्याच्या ) आश्रयाखालीं किंवा वशिल्याचा असणें . जो कोणा तरी थोर माणसाच्या बगलेंत असेल त्याला सारे लोक नमून असतात .
अंकित असणें ; मुठींत असणें .
बगला मारणें - क्रि . ( कृषि . ) डोळे , मोड , अंकुर पुसून काढणें ; डोळे काढून टाकणें . ( एखादी वस्तु )
बगलेंत घालून चतु : समुद्राचें स्नान करुन येणें - ( ल . ) ती वस्तु आपल्या खिजगणतींत नाहीं असें धरुन वांगणें .
बगलेंत धरणें - आपल्या आश्रयाखालीं घेणें .
बगलेंत मारणें - छाती व बाहू यांच्यामध्यें दाबून धरणें ; काखोटीत मारणें .
बगलेंतील गोष्ट - स्वकपोल कल्पित गोष्ट .
गोष्ट बगलेतून काढणें , बगलेतून काढणें - खोटी गोष्ट बनवून ती खरी करुन सांगणें ; बात झोकणें ; बनावट गोष्ट करणें .
म्ह० तें काम त्याच्या बगलेंतलें आहे = तें त्याला सहज करतां येण्याजोगें आहे . याशिवाय जास्त वाप्र . साठीं काख पहा . सामा . शब्द -
०थैली स्त्री. खाकेंत अडकविण्याची पिशवी .
०बच्चा पु. सर्वस्वी दुसर्याच्या तंत्रांनें चालणारा ; दुसर्याचा हस्तक .
वशिल्याचा माणूस .
०बंद पु. ( अंगरखा इ० चा ) काखेखालील आवळण्याचा बंद . [ फा . ]
०बिल्ली स्त्री. लाडिकपणें वागविलेलें मूल ; आवडतें मूल .
( कांहींच्या मतें ) काखमांजर .
( ल . ) वशिल्याचा मनुष्य . [ हिं . बिल्ली = मांजर ]
०भावार्थी वि. दिसण्यांत गरीब , साधाभोळा पण संधि सांपडली कीं बगलेंत मारुन लांबविणारा ; भगलभावार्थी ; कावेबाज .
०भिस्ती स्त्री. चामड्याची पाण्याची पिशवी ( पखाल ) बगलेंत नेणारा याहून पाठीवर पखाल वाहणारा निराळा .
( विनोदानें ) शिजलेला परंतु अधिक दिवस ठेवल्यामुळें नासलेला भाजीपाला , दहीं इ० पदार्थ . [ हिं . बगल बहस्ती ]
बगला , बगलेक - अ . ( गो . ) पाशीं , जवळ ; कडे .
बगलाविणें - सकि . चोरलेला माल बगलेंत मारुन चालतें होणें .
बगली - स्त्री .
छातीला मांडीच्या घर्षणासुळें पडणारें क्षत , व्रण .
( बगलेखालीं आणून ) मुदगल खेळण्याचा एक प्रकार .
कुस्तींतील एक डाव ; आपला एक हात जोडीदाराच्या मानेवर ठेवून दुसर्या हातानें त्याच्या हाताचा पंजा धरुन तो वर वरुन बगले खालून जाऊन त्याला चीत करणें .
पाय घसरल्यानें उंटास होणारा रोग .
मल्लखांबाची एक उडी . - वि . वरील प्रमाणें घसणारा ( उंट ).
बगल्या - वि .
दुसर्याच्या हाताखालीं चाकरी करणारा ; मदतनीस ; हस्तक ; अर्ध्यावचनांत , अर्ध्या मुठींत असणारा ; पार्श्वक ; होयबा ; अंकित .
०चोर पु. बाह्यत : प्रतिष्ठेनें वागून संधि मिळाली कीं बगलेंत मारुन नेण्यास ( चोरण्यास ) तयार असलेला इसम .